Tokyo Olympic 2020 : कांस्यपदकासह P.V.Sindhu ने रचला इतिहास, ठरली दोन पदकं मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Toykyo ऑलिम्पिमध्ये पी. व्ही. सिंधूने ब्राँझ मेडल जिंकलं आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने किमान रौप्य पदक जिंकावं अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा तिने पूर्ण केली आहे. चीनच्या बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत तिने हा सामना जिंकला आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे तिचं दुसरं पदक ठरलं. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. आता तिने ब्राँझ मेडल जिंकलं आहे. तिच्या या कामगिरीनंतर तिच्यावर भारतातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधूने आज जो खेळ केला आणि जी पदकाची कमाई केली त्यामुळे भारताची मान उंचावली आहे. या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधूचं अभिनंदन केलं आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही पी. व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधू तू इतिहास घडवलास असं म्हणत ट्विट करून त्यांनी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सिंधूचं कौतुक केलं आहे. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे असं म्हणत कोविंद यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

पहिल्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात केली. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये सिंधूकडे ४-० अशी आघाडी होती. परंतू चीनच्या हे बिंग जिआओ ने चांगली झुंज देत सिंधूला बरोबरीत रोखलं. ४-० अशा आघाडीवर असलेल्या सिंधूशी बरोबरी करत हे बिंगने पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली. चिनी खेळाडूंच्या रणनितीसमोर सिंधू पुन्हा एकदा कमी पडते की काय असं वाटत असतानाच सिंधूने वेळेत स्वतः सावरलं.

ADVERTISEMENT

आपल्या ठेवणीतले काही फटके वापरत सिंधूने मध्यांतरापर्यंत पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ११-८ अशा आघाडीनंतर पहिला सेट सुरु झाला. ज्यानंतर सिंधूने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. युवा चिनी खेळाडूला तिने कोर्टच्या दोन्ही बाजूला पळवत सुरेख वसूल केले. हे बिंगने सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा…परंतू सामन्यावर पकड मजबूत केलेल्या सिंधूने नंतर हे बिंगला पुनरागमन करण्याची संधीच न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात करत सेटमध्ये आघाडी घेतली. आपल्या अनुभवाचा फायदा घेत सिंधूने हे बिंगला चुका करायला भाग पाडत एका क्षणाला ५-२ अशी आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरादाखल हे बिंगनेही काही सुरेख फटके खेळले. सिंधूला अडचणीत आणत हे बिंगने काही सुरेख स्मॅशचे फटके खेळत आपले इरादे स्पष्ट केले. दुसऱ्या सेटमध्ये हे बिंग सिंधूला मोठी आघाडी घेऊ देत नव्हती. सिंधूने क्रॉस कोर्ट स्मॅशचा सढळ हस्ते वापर करत हे बिंगवर दडपण आणायला सुरुवात केली. सिंधूच्या या आक्रमक खेळाचं उत्तर हे बिंग जिआओच्या खेळात नव्हतं. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काही सुंदर रॅली झाल्या, ज्याचा फायदा घेत हे बिंगने सिंधूला पुन्हा एकदा आव्हान देण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंमध्ये सिंधूचा अनुभव हा उजवा असला तरीही हे बिंगही तिला सहज आघाडी घेऊ देत नव्हती. अखेरीस आपला अनुभव पणाला लावत सिंधूने दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली. बिंगने सिंधूला कडवी झुंज देत मोठी आघाडी घेऊ दिली नाही. अखेरीस सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत २१-१५ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत कांस्यपदकावर नाव कोरलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT