Virat Kohli च्या टीमचे Twitter अकाउंट हॅक, भलतेच पोस्ट व्हायरल

मुंबई तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. स्टार खेळाडू विराट कोहलीच्या टीमचे अकाउंट हॅक झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. कारण ट्विटर अकाऊंटवरून अशा अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता याबाबत आरसीबीकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. आरसीबीचे ट्विटर अकाउंट हॅक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. स्टार खेळाडू विराट कोहलीच्या टीमचे अकाउंट हॅक झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. कारण ट्विटर अकाऊंटवरून अशा अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता याबाबत आरसीबीकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.

आरसीबीचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटरवर NFT शी संबंधित अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या. यासोबतच प्रोफाईल नाव आणि प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला आहे. खात्याचे नाव बदलून बोरड एप यॉट क्लब असे करण्यात आले.

खात्याचे नाव आणि फोटो बदलल्यानंतर बायोसह अनेक बदल करण्यात आले. अनेक पोस्ट अजूनही अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये NFT शी संबंधित माहिती देण्यात आली होती.असे अनेकवेळा घडले आहे जेव्हा RCB चे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे आणि अशा पोस्ट केल्या गेल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp