Wrestlers Protest : 7 तक्रारी… WFI ब्रिजभूषण सिंह यांच्यावर नेमके आरोप काय?
7 पैलवानांनी 21 एप्रिल रोजी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याचे दोन गुन्हे दाखल केले.
ADVERTISEMENT

wrestlers protest reason : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी कारवाईसाठी आंदोलन छेडले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींवरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. आता दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील माहिती समोर आली आहे. या एफआयआरमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर शरीरसुखाची मागणी, चुकीच्या पद्धतीने स्पर्श, तसेच इतरही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. समजून घेऊयाच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? (Why are athletes protesting in India?)
What is the case of wrestlers : 7 पैलवानांनी 21 एप्रिल रोजी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याचे दोन गुन्हे दाखल केले. पहिली एफआयआर अल्पवयीन पीडितेने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांशी संबंधित आहे.
एफआयआरमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर हे आरोप आहेत
दोन्ही एफआयआरमध्ये भादंवि कलम 354 (महिलांवर अत्याचार किंवा बळजबरी करणे), 354A (लैंगिक छळ), 354D (पाठलाग करणे) आणि 34 (हेतू) या दोन्ही एफआयआरमध्ये नमूद केले आहे, ज्यामध्ये आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला एक ते तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पहिल्या एफआयआरमध्ये 6 कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा समावेश असून WFI सचिव विनोद तोमर यांचे नावही त्यामध्ये आहे.
हेही वाचा >> ‘सत्य समोर यायला हवे’, भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी मोदी सरकारला सुनावलं
दुसरी एफआयआर अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवर आधारित आहे आणि त्यात POCSO कायद्याच्या कलम 10 चीही नोंद आहे. यामध्ये प्रकरणात दोषी ठरल्यास आरोपीला पाच ते सात वर्षांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ज्या घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्या 2012 ते 2022 या कालावधीत भारतात आणि परदेशात घडल्या आहेत.