अखेर 500 वर्षानंतर योग आलाच! 'या' राशींसाठी प्रगतीचे नवे पर्व सुरु, चतुर्ग्रही राजयोग तुमच्या नशीबात आहे का?

Chaturgrahi Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीला चतुर्ग्रही योग तयार होत आहे. द्रिक पंचांगानुसार, मीन राशीत चंद्र, शनि, सूर्य आणि शुक्र हे चार मोठे ग्रह एकत्र विराजमान आहेत. चैत्र नवरात्रीला असा चतुर्ग्रही योगाचा संयोग तब्बल 500 वर्षांनंतर जुळून येत आहे.

Chaturgrahi Rajyog 2026

Chaturgrahi Rajyog 2026

मुंबई तक

• 08:41 AM • 20 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अखेर 500 वर्षानंतर योग आलाच!

point

'या' राशींसाठी प्रगतीचे नवे पर्व सुरु

point

चतुर्ग्रही राजयोग तुमच्या नशीबात आहे का?

Chaturgrahi Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीला चतुर्ग्रही योग तयार होत आहे. द्रिक पंचांगानुसार, मीन राशीत चंद्र, शनि, सूर्य आणि शुक्र हे चार मोठे ग्रह एकत्र विराजमान आहेत. चैत्र नवरात्रीला असा चतुर्ग्रही योगाचा संयोग तब्बल 500 वर्षांनंतर जुळून येत आहे. जेव्हा एकाच राशीत चार ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्या स्थितीला 'चतुर्ग्रही योग' असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे, परंतु काही राशींसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरणार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, 6 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचं सावट

'या' राशींसाठी ठरणार लाभदायक

मेष रास : मेष राशीच्या जातकांना अचानक धनलाभाच्या संधी मिळू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा परदेशी जाण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याचे योग आहेत. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीतूनही चांगला फायदा होऊ शकतो, मात्र विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्य बदलणारा ठरू शकतो. दीर्घकाळ रेंगाळलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. नात्यांमधील गोडवा वाढेल आणि जुने वाद मिटू शकतात.

तूळ रास : तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये उन्नतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमची ओळख निर्माण होईल. पदोन्नतीचे (प्रमोशन) योग बनू शकतात. उत्पन्नातही चांगली वाढ पाहायला मिळू शकते. वाहन खरेदीचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठी नवीन डील्स फायनल होऊ शकतात, ज्यामुळे लाभ होईल. जोडीदाराची साथ लाभेल आणि कौटुंबिक जीवन सुखी राहील.

हे ही वाचा : Personal Finance: युद्ध झालं तर तुम्हाला Health Insurance मिळेल का? 'हा' नियम ठेवा लक्षात, नाहीतर...

धनु रास : धनु राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत शुभ असेल. उत्पन्नात वाढ होण्यासोबतच नोकरीत कौतुक आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. परदेशातून नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. व्यापारातही चांगला फायदा होऊ शकतो. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. धार्मिक कार्यांत रुची वाढेल आणि मानसिक शांतीचा अनुभव येईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

    follow whatsapp