मुंबईतील धारावीत पार्किंगच्या वादाला रक्तरंजित वळण, आशिक खानने अश्विनला बेदम मारहाण करत ठार केलं

Mumbai crime : मुंबईतील धारावीत एका क्षुल्लक कारणावरून तरुणाने एका व्यक्तीची हत्या केली. पार्किंगच्या वादाने घटनेला रक्तरंजित वळण प्राप्त झाले. तरुणाने पार्किंग लॉटमध्ये मित्र अश्विन नाडार (वय 22) याला बेदम मारहाण करत ठार केले. मारहाण करणाऱ्याचे नाव आशिक खान असे असून पोलिसांनी त्याला अटक केली.

Mumbai crime

Mumbai crime

मुंबई तक

• 02:49 PM • 22 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्कूटर पार्किंगवरून वाद दोघांमध्ये वाद 

point

आशिक खानने अश्विनला ठार केलं

Mumbai Crime : मुंबईतील धारावीत एका क्षुल्लक कारणावरून तरुणाने एका व्यक्तीची हत्या केली. पार्किंगच्या वादाने घटनेला रक्तरंजित वळण प्राप्त झाले. तरुणाने पार्किंग लॉटमध्ये मित्र अश्विन नाडार (वय 22) याला बेदम मारहाण करत ठार केले. मारहाण करणाऱ्याचे नाव आशिक खान असे असून पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कुटुंबातील पाच लोकांचा अंत, दोघांचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 3 मुलांना विष पाजल्याचा पोलिसांचा संशय

स्कूटर पार्किंगवरून वाद दोघांमध्ये वाद 

अश्विन व्हिडिओत हात जोडून विनंती करतो, पण आशिक त्याला मारहाण करतो आणि त्याची हत्या करतो. धक्कादायक बाब म्हणजे, वाद थांबवण्याऐवजी काहीजण नुसती बघ्याची भूमिका घेतात. दरम्यान, ही संपूर्ण घटना 16 मार्च रोजी घडली होती. आशिक आणि अश्विन यांच्यात स्कूटर पार्किंगवरून वाद झाला होता. 

हे ही वाचा : यवतमाळ : 6 वर्षाची मुलगी बेपत्ता, 'एवढ्या' दिवसानंतर पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, गावातील घराची झडती सुरु

आशिक खानने अश्विनला ठार केलं

त्या दोघांमधील वाद वाढत गेला असता, अखेरीस आशिक खानने अश्विनवर जीवघेणा हल्ला करत ठार केलं. व्हिडिओत अश्विनचं पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं. त्याने अशिकला विनंती केली पण त्याने तिला जमिनीवर ओढले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यानंतर पीडित तरुण अश्विनला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तपासादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. आशिक खानने अश्विनला मारहाण केली, त्यात काही लोकांना जमाव तिथून जाण्यास सांगतो, तर काही लोक व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत. या हल्ल्यात अखेर अश्विनचा दुर्दैवी मृत्यू होता. 

    follow whatsapp