पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून ब्लेडने सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागली...

Pune Crime News : पुण्यातील चंदननगर भागात एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणीवर घरात घुसून ब्लेडने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून आरोपी दिलीप राठोड अद्याप फरार आहे.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

• 11:20 AM • 03 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून ब्लेडने सपासप वार

point

रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागली...

Pune Crime News : पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात घुसून ब्लेडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असून, एकतर्फी प्रेमातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने तरुणीच्या घरात शिरून तिच्यावर धारदार ब्लेडने वार केले आणि तिला गंभीर जखमी अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

 तरुणीची प्रकृती चिंताजनक; मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू

या भीषण हल्ल्यात जखमी झालेली तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने पुढील उपचारांसाठी पुण्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ती मृत्यूशी झुंज देत असून डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे. तीन-चार दिवस उलटूनही तरुणीची प्रकृती अद्याप स्थिर झालेली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून पीडितेच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात असून तिच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा : मिसिंग लिंकला किती कोटींचा खर्च आला? त्याला नाव काय देणार? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले...

 आरोपी दिलीप राठोड 'वाँटेड' घोषित; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

चंदननगर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटवली असून दिलीप रमेश राठोड असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आता अधिकृतपणे 'वाँटेड' घोषित केले असून त्याच्या अटकेसाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपी दिलीप राठोड याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आणि त्यानंतर तो पोलिसांच्या सापडत नसल्याची माहिती आहे. त्याला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पोलीस तांत्रिक तपासाची आणि खबऱ्यांची मदत घेत आहेत.

एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक परिणाम; आरोपी अद्याप पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

या संपूर्ण प्रकरणाचा प्राथमिक तपास केला असता, आरोपी दिलीप राठोड याचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्यातूनच त्याने हा हिंसक मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. तरुणीने त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने सूड भावनेतून हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. भरवस्तीत आणि घरात घुसून अशा प्रकारे हल्ला करण्याचे धाडस आरोपीने केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा वारं फिरलं, 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार थैमान, IMD चा अलर्ट जारी