पुण्याची गोष्ट : पुणे शहरात स्वत:चं हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. आता अशाच नागरिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील ताथवडेमध्ये गृहप्रकल्पासाठी 8 जुलै 2026 रोजी 792 सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात येतेय. या लॉटरीसाठी आज, सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि स्वीकृत प्रक्रियेला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालना : अंत्यविधीसाठी आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, घटनेनं शहर हादरलं
आयटी हब आणि पिंपरी चिंचवड औद्योगिकरणाने प्रकल्पाला मागणी
हा प्रकल्प पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्गानजीक आहे. याच ताथवडे परिसरात आयटी हब आणि पिंपरी चिंचवड औद्योगिकरणाने वेढल्या गेलेल्या प्रकल्पामुळे या प्रकल्पाला मोठी मागणी आली आहे. या प्रकल्पाचा हा एक अंतिम टप्पा आहे, याआधी या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 600 हून अधिक घरांची यशस्वीरित्या विक्री झाली आहे.
म्हाडांच्या घरांची किंमत किती?
दरम्यान, या सोडतीत अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 24 सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर याचे क्षेत्रफळ साधारण 59 ते 60 चौ. मीटर आहे. 46 ते 47 लाख एवढी या घरांची किंमत आहे. तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी 768 सदनिका आहे, याचे क्षेत्रफळ हे 69 ते 70 चौ. मीटर आहे. दरम्यान, या घरांची किंमत 64.50 लाख ते 65.50 लाख रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली.
अर्जाची अंतिम मुदत
जे नागरिक हे घर विकत घेण्यासाठी इच्छूक आहेत, त्यांना म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी यासाठीची अंतिम मुदत 2 जून 2026 असेल. तर 30 जून रोजी पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर 8 जुलै 2025 रोजी या घरांच्या सोडतीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : भयंकर... मीरारोडमध्ये धर्म विचारून चाकूने भोसकले, अवघ्या परिसरात प्रचंड भीती!
अशातच, घरांच्या उत्पन्न गटांनुसार रक्कम भरणे अनिवार्य असणार आहे. ज्यात अल्प उत्पन्न गटासाठी 50 हजार रुपये, तर मध्यम गटासाठी 75 हजार रुपये अमानत रक्कम भरणे अनिवार्य आहे.
ADVERTISEMENT











