मँचेस्टर: ब्रिटनमधील मँचेस्टर येथील 22 वर्षीय तरुणी लॉरा हिने 18 कोटी रुपयांना तिचे कौमार्य विकून खळबळ उडवून दिली आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासाठी लॉरा हिने चक्क लिलाव बोलावला होता. ज्या लिलावात अनेक उद्योगपती आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. पण शेवटी एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने सर्वाधिक बोली लावून बोली जिंकली.
ADVERTISEMENT
याबाबत लॉरा म्हणाली की, तिने पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि तिला त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. तिने सांगितले की, अनेक महिला कोणत्याही आर्थिक किंवा भावनिक लाभाशिवाय त्यांचे कौमार्य गमावतात, परंतु तिने ते तिचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी म्हणून या गोष्टीकडे पाहिले आहे.
हे ही वाचा>> एक पाय नसलेली जीन्स! 'विचित्र फॅशन' Viral, या जीन्सची किंमत विचारूच नका...
मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार, मँचेस्टरमधील २२ वर्षीय तरुणी लॉरा हिने खुलासा केला आहे की, तिला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही आणि आता ती श्रीमंत पुरुषांची आवडती शुगर बेबी बनू इच्छिते.
लिलाव कसा झाला?
जर्मनीतील प्रसिद्ध एस्कॉर्ट एजन्सी 'सिंड्रेला एस्कॉर्ट्स'द्वारे लॉराने लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. या लिलावात मोठ्या उद्योगपतींनी आणि राजकारण्यांनी रस दाखवला, पण शेवटी एका हॉलिवूड अभिनेत्याने सर्वात जास्त बोली लावली आणि लॉराचे कौमार्य विकत घेतले.
हे ही वाचा>> IIT बाबाकडे सापडला गांजा! पोलिसांनी अटक करताच म्हणाला 'महाकुंभचा प्रसाद', नेमकं घडलं तरी काय?
लक्झरी जीवनशैलीची इच्छा
लॉरा म्हणते की, तिला या पैशातून तिचे जीवन आरामात जगायचे आहे आणि तिला आवडती 'शुगर बेबी' बनण्यास कोणतीही अडचण नाही. तिच्या मते, ही एक आर्थिक तडजोड आहे जी तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास सक्षम करेल.
धार्मिक कुटुंबातून आलेली असूनही लॉराचा मोठा निर्णय
लॉरा एका धार्मिक कुटुंबातून आली आहे, पण तिने सांगितले की तिचे संगोपन पारंपारिक असले तरी त्यामुळे तिच्या विचारसरणीवर मर्यादा आली नाही. तिने तिचा निर्णय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून घेतला आहे आणि तो इतर कोणत्याही व्यवहारासारखाच आहे.
लॉराच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही लोक याला महिला सक्षमीकरणाचे उदाहरण मानत आहेत, तर बरेच जण याला नैतिकतेशी जोडत आहेत.
लॉरा काय म्हणते?
लॉराला वाटते की, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तिला या पैशातून तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. ती म्हणाली, "मुली कोणत्याही फायद्याशिवाय त्यांचे कौमार्य गमावतात, पण किमान मी माझे भविष्य सुरक्षित केले आहे." असं ती म्हणाली.
ADVERTISEMENT











