'ज्याला मूलं-बाळ होतं नाही, त्याला अशोक खरातने सांगताच झालं', मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाला? VIDEO

Ashok Kharat Viral Video Nashik : नाशकातील भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात... अशोक खरात गावातील लोकांना प्राधान्य देत नव्हता, असंही गावकऱ्याने सांगितलंय.

Ashok Kharat Viral Video

Ashok Kharat Viral Video

मुंबई तक

22 Mar 2026 (अपडेटेड: 22 Mar 2026, 11:34 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'ज्याला मूलं-बाळ होतं नाही, त्याला अशोक खरातने सांगितलेल्या मार्गाने लगेच झालं',

point

मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाला?

Ashok Kharat Viral Video Nashik : "बाबाकडे (अशोक खरात) गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले होते. ज्याला मूलं-बाळ होत नाही, त्याला सांगितल्यानंतर मूलं-बाळ झालं. असे किस्से परिसरात ऐकले आहेत. त्या माणसाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. बाहेरचे अनेक लोकं त्यांच्याकडे येत होते. बाबांनी असं करायला नको होतं. परिसरात त्यांचं खूप मोठं नाव होतं. आता गावाचं नाव बदनाम झालंय", अशी माहिती मिरगावमधील एका ग्रामस्थाने दिली. तो मुंबई Tak शी बोलत होते. गावात अशोक खरातबद्दल काय बोललं जायचं? याबाबतही त्याने सविस्तर माहिती दिली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद, पतीने पत्नीला बेदम मारहाण करत ठार मारलं

'आम्हाला त्याच्या कृत्याची माहिती असती तर आमचेही संबंध वाईटच असते'

ग्रामस्थ अशोक खरातबद्दल बोलताना म्हणाला, "आमचा साहेबांशी (अशोक खरात) 9-10 वर्षांपासून परिचय आहे. आम्ही मूळचे इथलेच आहोत. त्यामुळे जाणं-येणं अगदी जवळून आहे. येथील शंकराचं मंदिर हे गावाची शानच आहे. मंदिरासाठी लोकांचा विरोध राहणार नाही. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकांचा त्यांना विरोध असेल. मीडियासमोर हे प्रकरण समोर आलं. आम्हाला याची माहिती असती तर आमचे आणि त्यांचे संबंध वाईटच असते"

हेही वाचा : अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO

'या व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गावाचं नाव बदनाम झालंय'

"आम्ही त्यांचेकडे गेलो होतो. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या वेटिंगमुळे आम्ही कधी त्याच्याकडे थांबलो नाही. ते स्थानिक लोकांना कधी प्राधान्य देत नव्हते. बाहेरचे लोकं शनिवार-रविवार भरपूर यायचे. आम्ही घरातील समस्या घेऊन जाणार होतो. पण आम्हाला त्याने वेळ न दिल्यामुळे नंतर परत जाणे झाले नाही. आमचा घरगुती प्रॉबलेम होता. वेळ न दिल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. राजकीय नेत्यांना त्यांच्याबद्दल माहिती असतं तर तेही इथं आले नसते. या व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गावाचं नाव बदनाम झालंय", असंही गावकऱ्याने सांगितलं.

पुढे बोलताना तो म्हणाला, आम्ही बाहेरच्या लोकांना कधीच विचारलं नाही, तुम्ही कशासाठी येता? आणि का येता? आमच्या समस्येचं निवारण करण्यासाठी त्यांनी आम्हाला नाशिकला बोलावलं होतं. मात्र, आमच्या मनातचं नव्हतं नाशिकला जायचं.. कारण तिथं पैसे मागतात, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्याकडे काय पैसे नव्हते. 

Ashok Kharat च्या मिरगावातले ग्रामस्थ काय म्हणाले? | Nashik Viral Video | Crime | Rupali Chakankar

इतर महत्त्वाच्या बातम्या 

साडेसातीचा त्रास संपला, आता फक्त प्रगती आणि आनंद! शनिदेवांच्या कृपेने 'या' राशींचे नशीब उजळणार

    follow whatsapp