Maharashtra Weather : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पुढचा आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे तर, त्यानंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे तापमानात वाढ होऊ शकते, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : फलटणमध्ये शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा लढवणार निवडणूक, दुसरीकडे भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा :
एकूण राज्यातील तापमान कसं आहे?
- जळगाव- 8° से.
- निफाड -8° से.
- पुणे - 10° से.
- नाशिक -10.4° से.
- सातारा - 12° से.
- नागपूर - 9.6° से.
- बदलापूर - 15° से.
- सोलापूर - 15° से.
- ठाणे - 16° से.
- मुंबई - 21° से.
अचानक थंडी का वाढलीय?
तर, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि वातावरणात बाष्पाचा अभाव असल्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडीची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादाळाचा राज्याच्या हवामानावर मोठा परिणाम झाला. वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. त्यामुळे थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 18 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून तापमानाचा पारा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुके
घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरत असून दृश्यता कमी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
हे ही वाचा : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने विरोधकांनी घेरलं, आता भाजपचा मोठा निर्णय
हवामानशास्त्रात ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ असे दोन घटक आहेत. त्यात एन निनो स्थितीमध्ये उष्ण तापमान, तर ला निना स्थितीमध्ये थंड तापमान असते. एल निनो, ला निना स्थितीचा भारतावर परिणाम होतो. या अनुषंगाने नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान तापमानात घट होण्यामागे ‘ला निना’चा प्रभाव हेही कारण असू शकते, असे कश्यपी यांनी नमूद केले.
ADVERTISEMENT











