Maharashtra Weather: राज्यातील काही भागांमध्ये जून महिन्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होता. तर सध्या जुलै महिन्यात राज्यातील मान्सूनचा विचार केल्यास पावसाचा जोर कायम असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, 28 जून रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये हवामान विभागाने मान्सूनच्या एकूण परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मान्सूनची स्थिती कशी असेल, याबाबत पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
कोकण :
हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 28 जून रोजी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यापैकी रायगड, रत्नागिरीत मान्सूनचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : मार्क्स देतो असं सांगत शिक्षक विद्यार्थिनीलाच घरी बोलवायचा, नंतर विद्यार्थिनीच झाली प्रेग्नंट, हादरून टाकणारी घटना
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये 28 जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर पुण्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर कोल्हापुरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. पुण्यातील घाटमाथ्यावर मान्सूनचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 28 जून रोजी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तापमान 26 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रता 65-70% असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जालना येथील काही भागात मागील आठवड्यात ढगफुटीसदृश स्थिती होती.
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळसह विदर्भात 28 जून रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर नागपुरात सरासरी 1205 मिमी पावसाची नोंद होत असते. यंदा जून महिन्यात एकूण सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गडचिरोलीत सरासरी आर्द्रता 62% असून, तापमान 25 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि आहिल्यानगरातील या भागांमध्ये 28 जून रोजी तुरळक ठिकाणी पावसासह ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये मान्सूनचे प्रमाण हे कमी होते. हीच स्थिती अंतिम आठवड्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. तापमान 26 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असेल, असा हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
