Maharashtra Weather : राज्यात 'या' विभागांत हवामान बदललं, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट जारी

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर हवामान स्रोतांनुसार, राज्यात 5 फेब्रुवारी 2026 रोजी हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:00 AM • 05 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभाग (IMD) अंदाजानुसार हवामानाचा अंदाज

point

राज्यात 5 फेब्रुवारी 2026 रोजी कसं असेल हवामान

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर हवामान स्रोतांनुसार, राज्यात 5 फेब्रुवारी 2026 रोजी हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची केली निर्घृण हत्या, नातेवाईकांकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

कोकण : 

कोकण विभागात किनारी भागांत काही ठिकाणी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत 29-30 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या भागांत आकाश निरभ्र ते ढगाळ हवामान अपेक्षित असेल. पुणे आणि परिसरात उष्णता जाणवेल. थंडीचे प्रमाण कमी होणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   

मराठवाडा :  

मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील. तसेच याच विभागात थंडावा कमी राहणार असून उष्णतेत वाढ होणार आहे. 

हे ही वाचा : बायकोच्या पोटात 2 महिन्यांचा वाढत होता गर्भ, पीडितेनं हुंडा न दिल्याने नराधम्यांनी पोटात घातल्या लाथा

विदर्भ : 

विदर्भातील नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. नागपूरसारख्या शहरात दिवसा उष्ण आणि रात्री तुलनेनं थंडावा अधिक जाणवेल. 

    follow whatsapp