रायगड: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th या खासगी अकॅडमीच्या सहलीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व 8 विद्यार्थी अवघ्या 16 वर्षांचे होते. या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
रायगड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गुरुवारी, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. या सहलीत 25 मुले, 17 मुली आणि सहा शिक्षक, असे एकूण 48 जण सहभागी झाले होते.
समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज चुकला
दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 8 जण समुद्रात पोहत होते. मात्र, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे आठही विद्यार्थी पाण्यात बुडाले. या घटनेनंतर समुद्रकिनारी एकच धावपळ उडाली.
हे ही वाचा>> रायगड: समुद्रात मृत्यूचं तांडव; दिवे-आगरमध्ये आळंदीतील 8 जणांचा बुडून मृत्यू
स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यांना किनाऱ्यावर आणून वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली.
हे ही वाचा>> 'त्याने माझ्यावर अनेक वार केले...', भारताचा ढाण्या वाघ... कॅप्टन स्मितचा हल्ल्यानंतरचा पहिला VIDEO
मृत आठ विद्यार्थ्यांची नावे समोर
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
- तन्मय दत्तात्रय वहीले
- सुमित भरत अहिरे
- प्रणव रामदास बनसोडे
- कैवल्य सतीश वासनकर
- राजवीर युवराज वहीले
- यश किरण वानखेडे
- सोहम तुकाराम भांडवलकर
- कौस्तुभ संदीप दौंड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेले सर्व विद्यार्थी 16 वर्षांचे असून आळंदी, पुणे येथील रहिवासी होते.
सहलीच्या आनंद, पण काळाने घातला घाला
शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने दिवेआगरला आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या प्रकरणात रायगड पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












