Govt Jobs : SSB मध्ये 404 जागांसाठी मेगा भरती, खेळाडूंना सुवर्णसंधी; 'असा' करा अर्ज

SSB मध्ये 404 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून आहे.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

• 04:49 PM • 09 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : SSB मध्ये 404 जागांसाठी मेगा भरती

point

खेळाडूंना सुवर्णसंधी

point

'असा' करा अर्ज

Government Jobs : भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या 'सशस्त्र सीमा बल' (SSB) मध्ये 'कॉन्स्टेबल (general duty)' पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती दहावी पास असणाऱ्या आणि 'स्पोर्ट्स कोटा' म्हणजेच क्रीडा प्रवर्गांतर्गत प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी केली जाणार असून, यासाठी एकूण 404 रिक्त जागा उपलब्ध आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही उमेदवारांना देशसेवेची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती जनरल सेंट्रल सर्व्हिस, गट 'क' (नॉन-गेझेटेड) या श्रेणीत केली जाईल.

हे वाचलं का?

'इतका' मिळणार पगार

या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 21,700 ते 69,100 रुपये (स्तर-३) या श्रेणीत वेतन दिले जाईल. याशिवाय सशस्त्र सीमा बलामध्ये लागू असलेले इतर सर्व भत्तेही उमेदवारांना देय असतील. ही पदे 'कॉम्बॅटाईज्ड' स्वरूपाची असल्याने उमेदवारांना शिस्तबद्ध आणि आव्हानात्मक वातावरणात काम करण्याची संधी मिळणार आहे. क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

हे ही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला

'असा' करा अर्ज

भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मे पासून सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.recruitment.ssb.gov.in किंवा www.ssb.gov.in वर जाऊन विहित नमुन्यात आपले अर्ज भरायचे आहेत. 

हे ही वाचा : पीएम मोदी पाया पडले अन् आनंदाने मिठीही मारली, माखनलाल सरकार आहेत तरी कोण?

'अशी' होणार निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने कागदपत्रांची पडताळणी, क्रीडा नैपुण्याची पडताळणी, शारीरिक मानक चाचणी (PST), मैदानी चाचणी किंवा कौशल्य चाचणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी (DME/RME) यांचा समावेश असेल. सर्व निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल. पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.