Man Fall On Iron Rod in Thane : ठाण्यातील (Thane) वर्तकनगर (Vartak Nagar) परिसरात एक भयानक प्रकार घडला आहे. रौनक रेसीडन्सी नावाच्या इमारतीचं बांधकाम (Building Construction) सुरू असलेल्या या ठिकाणी ही विचित्र घटना घडली. बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांवर एक 19 वर्षीय तरूण एवढ्या जोरात आदळला की, एक सळई त्याच्या कंबरेत घुसून दुसऱ्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली. (Thane News 19 years Boy Fall On Iron Rod it penetrated the waist directly through the thigh)
ADVERTISEMENT
या भयंकर घटनेनंतरही हा तरूण शुद्धीत होता ही आश्चर्याची बाब आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
वाचा : Marathi News Live : जरांगेंचा आरक्षणासंदर्भात शिंदे सरकारला महत्त्वाचा सल्ला
तरूणासोबत नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार रविवारी (14 जानेवारी) घडला. रौनक रेसीडन्सी नावाच्या निर्माणाधीन साईटवर असलेल्या सुरक्षारक्षकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. सुरक्षारक्षकाला हा तरूण बांधकामासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांवर पडलेला दिसला. त्याच्या डाव्या बाजूच्या कंबरेत सळई शिरून ती उजव्या पायाच्या जांघेतून आरपार निघाली होती.
वाचा : ‘ठाकरेंनी लोकसभेचं खातं उघडून दाखवावं’, गिरीश महाजनांचं थेट चॅलेंज
सुरक्षारक्षकाने हे पाहताच इतर कामगारांना बोलावलं. पण हा तरूण या साईटवर कामगार म्हणून काम करत नव्हता. यावेळी कामगारांनी ग्राइंडर मशीनच्या मदतीने या तरुणाच्या शरीरात घुसलेली सळई मुख्य साचापासून वेगळी केली आणि रुगणवाहिकेतून उपाचारांसाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं.
वाचा : Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्द आणि 4 मागण्या, जरांगे-बच्चू कडूंमध्ये काय झाली चर्चा?
सध्या तरूणावर उपचार सुरू आहेत. तसंच तो याठिकाणी कसा पोहोचला? इथे का आला होता? कसा पडला? त्याला कोणी मुद्दाम धक्का तर दिला नाही ना? याबाबत पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT