Uddhav Thackeray : 'लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी...', ठाकरेंच्या विधानाने खळबळ

भागवत हिरेकर

08 Mar 2024 (अपडेटेड: 08 Mar 2024, 03:21 PM)

Uddhav Thackeray latest News : उद्धव ठाकरे यांनी कळंब येथील सभेत राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले.

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबद्दल उद्धव ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

follow google news

Uddhav Thackeray Rahul narwekar Shiv Sena Verdict : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबद्दल उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं. राहुल नार्वेकर यांना भाजपने लालूच दाखवली आणि त्यामुळे त्यांनी विरोधात निकाल दिला, असे ठाकरेंनी म्हटले आहे. जाहीर सभेत हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Rahul Narwekar gave Verdict against me for lok sabha nomination, uddhav Thackeray big allegation)

हे वाचलं का?

कळंब येथे उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांच्या भाजप पक्षप्रवेशावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबद्दल मोठं विधान केले. 

उद्धव ठाकरे न्याय व्यवस्थेबद्दल काय बोलले?

ठाकरे म्हणाले, "मी त्या नार्वेकरलाही सांगतोय. त्या लबाडाला... होय, लबाडच आहे तो. आता निवडणूक लढतोय म्हणे भाजपकडून... मग मला सांगा... बंगालमध्ये एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला आहे. गंगोपाध्याय... निवडणुकीच्या तोंडावर गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत."

हेही वाचा >> "उद्धवजी, कल आप को आना है", शाहांनी फोनवर काय सांगितलेलं? 

याच मुद्द्यावर पुढे ते म्हणाले, "आज सामनामध्ये अग्रलेख आहे... काल सुद्धा लोकसत्तेमध्ये अग्रलेख होता... न्यायदेवता बाटली. हे महोदय ज्यावेळी न्यायमूर्ती होते, तेव्हा असे काही निर्णय त्यांनी दिले... तृणमूल काँग्रेसच्या विरोधात त्यांनी निर्णय दिले. आज ते बाहेर पडले आणि तृणमूल काँग्रेसवर आगपाखड करताहेत. मग तुम्ही त्या खुर्चीवर बसला होतात, त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं हे कशावरून?", असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा >> 'आता वेळ आली...', युगेंद्र पवारांनी घातला थेट बारामतीकरांच्या काळजालाच हात! 

"तेच गंगोपाध्याय सांगताहेत की, भाजप माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो. म्हणजे न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल करणं हे चोरी छुपे चालत होतं. पण, आज उघडपणे न्यायदानामध्ये ही भाजपची काळी मांजरे बसली असतील तिकडे तर आम्ही न्याय मागणार कुणाकडे?", असा सवाल करत ठाकरेंनी शंका उपस्थित केली. 

राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरेंनी काय केला आरोप?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर बोलताना ठाकरे म्हणाले, "तसंच हे नार्वेकर... आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमदेवारी देण्याची लालूच दाखवून तुम्हाला माझ्या शिवसेनेच्या विरोधात निर्णय द्यायला लावला. हा माझा आरोप आहे."

हेही वाचा >> 'मला शरद पवार म्हणतात', असं पवारांना का म्हणावं लागलं?

"कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की तुम्ही (राहुल नार्वेकर) म्हणजे त्या लबाडाने जो काही निकाल दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध वाटत नाही काय?  हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पण, हे एवढे निर्लज्ज आहेत... भाजप काय मिंधे काय... दुसरे ते गेलेत ७० हजार कोटीवाले... या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. हेही गेले तिकडे", अशी टीका ठाकरेंनी केली. 

    follow whatsapp