Sharad Pawar: 'मला शरद पवार म्हणतात', असं पवारांना का म्हणावं लागलं?

मुंबई तक

Sharad Pawar: 'मला शरद पवार म्हणतात..' असं विधान शरद पवार यांना का करावं लागलं? त्यामागचा नेमका इशारा काय आणि कोणासाठी होता? जाणून घ्या याचविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

शरद पवारांनी 'ते' विधान का केलं?
शरद पवारांनी 'ते' विधान का केलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी कोणाला दिला इशारा?

point

अजित पवारांना अप्रत्यक्ष आव्हान?

point

शरद पवारांची नेमकी खेळी काय?

Sharad Pawar vs Ajit Pawar: निलेश झालटे, मुंबई: जेव्हा संकटं येतात तेव्हा शरद पवार अधिक ताकदीने उभं राहतात, असं काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी म्हटलं होतं. आणि एखाद्याला टप्प्यात घेतलं की शरद पवार टप्प्यात कार्यक्रम करतात याचीही काही उदाहरणं आपण पाहिली आहे. साताऱ्यात पावसातल्या सभेतलं एक भाषण झालं आणि निवडणुकीचा नूर पालटला होता. शांतपणे प्लॅन आखून विरोधकांना नामोहरम करणारे पवार अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतर कमालीचे आक्रमक झाले आहेत. (why did pawar have to say i am called sharad pawar what is the actual politics in ncp)

'या वयात' या शब्दावर नेहमीच आक्षेप घेणार पवार खरोखरच या वयात पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसतात, तेव्हा समोरचा माणूस चिंतेत पडल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणाल हे सगळं का सांगितलं जातंय. कारण आता शरद पवारांनी अजितदादांच्या खास असलेल्या एका आमदाराला थेट निशाण्यावर घेतलं आहे. 

इतकंच नाही तर 'मला शरद पवार म्हणतात.., मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.' असं म्हणत त्यांनी दादांचे खास असलेल्या सुनील शेळकेंना इशाराच दिला. 

'मला शरद पवार म्हणतात' असं पवारांना का म्हणावं लागलं, हा इशारा शेळकेंना आहे की, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्या कुणाला? यामागं नेमकं काय राजकारण आहे हे आपण जाणून घेऊयात.  

हे वाचलं का?

    follow whatsapp