वर्धा: घरात आई-वडिलांचे सतत वाद... डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

घरात आई आणि वडिलांचे सतत वाद होत असल्याकारणाने वर्ध्यात एका तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

मुंबई तक

07 Dec 2025 (अपडेटेड: 07 Dec 2025, 10:48 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई-वडिलांच्या वादातून मुलीचं टोकाचं पाऊल

point

डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

point

वर्ध्यातील धक्कादायक घटना

वर्धा: घरात आई आणि वडिलांचे सतत वाद होत असल्याकारणाने वर्ध्यात एका तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना वर्ध्यातील सावंगी (मेघे) येथील ड्रीमलँड सिटी परिसरात घडली. पीडितेने घरात असलेल्या विषारी वायूच्या सिलिंडरमधील विषारी वायू गिळून स्वत:ला संपवल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

आई-वडिलांच्या वादामुळे डिप्रेशन... 

18 वर्षीय पीडित मुलीचं नाव नक्षत्रा अरुण वानखेडे असून तिने शनिवारी (6 डिसेंबर) आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरात असताना तिच्या आई-वडिलांचे सतत एकमेकांसोबत वाद व्हायचे. पीडितेच्या डोळ्यांसमोर तिच्या आई-वडिलांचं कोणत्या ना कोणत्या करणावरून सतत भांडण व्हायचं. या कौटुंबिक वादाचा पीडितेच्या मनावर खोल परिणाम झाला. आपल्या आई-वडिलांच्या सततच्या वादामुळे पीडिता नैराश्यात राहत होती. तिला घरात होत असलेल्या कौटुंबिक वादामुळे खूप वाईट वाटत होतं. 

हे ही वाचा: लातूर: कॅफेत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार! जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल...

विषारी वायू गिळून पीडितेची आत्महत्या 

घरातील वादामुळे मुलगी काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये जगत होती. अखेर, तिला आई-वडिलांचं वारंवार होत असलेलं भांडण असह्य झालं आणि तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. अखेर, शनिवारी तिने घरात असलेल्या विषारी वायूच्या सिलिंडरमधील विषारी वायू गिळून आत्महत्या केली. 

हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर : नातेवाईक मंडपात, पंगतही बसली; पण दामिनी पथकाची धाड अन् नवरदेवाला पळवून लावलं

पोलिसांचा तपास 

सावंगी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यानंतर, ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, पोलिसांनी पंचनामा करून पीडितेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. आता, या घटनेची पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

    follow whatsapp