Crime News : प्रेमप्रकरणाच्या रागातून एका तरुणाला विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण केल्याची आणि त्याला क्रूर शारीरिक यातना दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारच्या बक्सरमधील नावानगर पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला ग्रामस्थांनी झाडाझुडपात कण्हत पडलेल्या या तरुणाला शोधून काढले. पीडित तरुण रोशन शर्मा हा नावानगरचा रहिवासी असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
प्रेयसीच्या घरात आक्षेपार्ह अवस्थेत आढळला
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन शर्मा एका लग्नसोहळ्याच्या निमित्ताने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला होता. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, रोशन रात्रीच्या वेळी प्रेयसीच्या घरात शिरला असताना मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रोशनला ताब्यात घेऊन बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात त्यांनी सर्व सीमा ओलांडून तरुणावर अत्याचार केले.
हे ही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला
गुप्तांगावर गरम वस्तूने चटके
हल्लेखोरांनी रोशनला विवस्त्र करून त्याची क्रूर शारीरिक प्रताडना केली. इतकेच नव्हे तर, त्याच्या गुप्तांगावर आणि कमरेच्या खालच्या भागावर गरम वस्तूने चटके दिल्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाण इतकी भीषण होती की, तरुण बेशुद्ध पडल्यानंतर तो मृत पावला आहे असे समजून हल्लेखोरांनी त्याला जवळच असलेल्या झुडपात फेकून दिले आणि तिथून पळ काढला. शनिवारी (9 मे) सकाळी साडेआठच्या सुमारास स्थानिक नागरिकांना झाडीतून विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला.
हे ही वाचा : 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक
ग्रामस्थांनी दाखवली माणुसकी
स्थानिक ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत तरुणाला तातडीने कपडे देऊन सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नावानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रफुल्ल कुमार यांनी सांगितले की, पीडित तरुणाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देऊन पीडिताला न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











