Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपीवर पोलिसांनी गोळीबार केला होता. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या या गुन्हेगाराच्या दोन्ही पायांवर गोळीबार करण्यात आला, नंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घडलेल्या घटनेनुसार, 24 एप्रिल रोजी एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. असा आरोप करण्यात आला की, 28 वर्षीय बबलू सिंगने पोलिसांना सतत चकमा देत होता. त्याला जो शोधेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता याच चकमकीनंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अमरावती : सेल्फीचा नाद बेकार, दोन सख्ख्या भावंडांसह तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
होणाऱ्या पत्नीचे आरोप काय?
आरोपीला अटक करण्यात अपयश आल्यानंतर, पीडितेच्या प्रियकराने व्हिडिओ प्रसिद्ध करून पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. त्याने पुढे असा देखील आरोप केला की, आरोपीला अटक करण्यासाठी त्याला घरातच डांबून ठेवतात. मात्र, पोलिसांनी सुरक्षेची कारवाई करत असल्याचा दावा केला.
पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल आरोपीवर केला गोळीबार
रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला शोधून काढत त्याला घेरले. खागा, हातगाव, थारियाव या ठिकाणी मोठी चकमक झाली. बराच वेळी या ठिकाणी गोळीबार सुरु होता, गोळीबाराचा आवाज परिसरात घुमत होता. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत बललू सिंगच्या दोन्ही पायांना गोळी लागली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून काही वस्तू जप्त केल्या.
हे ही वाचा : लग्नाच्या वरातीत नवरदेवाला सुजेपर्यंत बडवला, आनंदाच्या दिवशी कार्यक्रमात रडारड, नेमकं काय घडलं?
जप्त केलेल्या वस्तू
ज्यात बेकायदेशीर पिस्तुल, 4 रिकाम्या काडतुसे, जिवंत काडतूस तसेच 16 हजार रुपये रोख रक्कम घेतले होते. या चकमकीत झालेल्या 28 वर्षीय बबलू सिंग याला पोलिसांनी तात्काळ अटक करून घेत उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या चकमकीत आरोपीचा 13 दिवसांचा शोध संपला.
ADVERTISEMENT











