भूत असल्याच्या संशय, 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या; मांत्रिकानेच...

crime news : भूत असल्याच्या संशयातून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मगध रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:55 AM • 16 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंधश्रद्धेतून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या

point

कुटुंबातील सदस्यांना आजारी पाडल्याचे षडयंत्र रचल्याचा समज

Crime News : बिहार येथील गया जिल्ह्यात अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा जीव गेला आहे. फतेहपुर ठाणे परिसरातील महादलिच टोला येथे भूत असल्याच्या संशयातून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मगध रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी 11 जणांविरुद्ध एफआरआय दाखल केला असून त्यांना अटक करत छापे टाकण्यात आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या, नेमकं प्रकरण काय?

अंधश्रद्धेतून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या

गया जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या नवानगर महादलित टोला येथे रविवारी मध्यरात्री आरडाओरड करत एकच गोंधळ उडाला. अंधश्रद्धेच्या नावाखाली एका उन्मत्त जमामाने एका 70 वर्षीय बुल्की देवी नामक वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. 

शेजारच्या महिलेला जखमी केले

संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला, काही ग्रामस्थांनी मिळून तिला संपवलं. या घटनेनंतर हल्लेखोर शेजारच्या घरावर हल्ला करून एका महिलेला जखमी करून गेले. त्या जखमी महिलेला गया येथील एका रुग्णालयात पाठवले. दरम्यान मृताच्या कुटुंबीयांच्या मते, हल्लेखोर बुल्की देवीवर जादुटोना केल्याचा गंभीर आरोप आहे. 

हे ही वाचा : नवऱ्याला दारू आणायला पाठवलं, व्यक्तीनं पीडितेवर घरात साधला डाव

अंधश्रद्धा हा गैरसमज डोक्यात ठेवून टोळक्याने वृद्ध महिलेची केली हत्या 

संबंधित प्रकरणात त्यांनी दावा केला, जादूटोणा आणि मांत्रिक विद्येच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आजारी पाडल्याचे षडयंत्र रचल्याचा गैरसमज होता. ही अंधश्रद्धा एक गैरसमज असल्याचं डोक्यात ठेवून टोळक्याने वृद्ध महिलेची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसरात संताप व्यक्त झाला.