दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग, विकृत भावाने 44 दिवसात बहिणीला संपवलं!

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 12:20 PM)

Crime News : सख्या भावाने आपल्या 19 वर्षीय बहिणीची गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग त्याच्या मनात उफाळला होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग

point

विकृत भावाने 44 दिवसात बहिणीला संपवलं!

 Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. थरियाव पोलीस ठाण्याच्या हसवा चौकीत 22 वर्षीय संदीप यादव हा तरुण स्वतःहून हजर झाला आणि त्याने अतिशय थंड डोक्याने आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली. 19 वर्षीय बहीण रंजूची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह जवळच्या एका विहिरीत फेकून दिला आहे. या बातमीने संपूर्ण पोलीस दल हादरले असून, एका भावाने बहिणीचा जीव घेतल्याच्या या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : वाशिम : नवऱ्याची बॉडी टॉवरला लटकलेली, तर बायको अन् दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत

honor killing च्या घटनेने परिसर हादरला 

मृतक रंजू यादव हिचे लग्न अवघ्या 44 दिवसांपूर्वी, 1 मे 2026 रोजी अजय यादव ऊर्फ पिंटू याच्याशी झाले होते. मजुरी करणाऱ्या कुटुंबातील रंजूच्या वैवाहिक आयुष्यात काही कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाले होते. याच कारणामुळे रंजूचा मोठा भाऊ संदीप तिला तिच्या सासरहून माहेरी घेऊन येत होता. मात्र, संदीपच्या मनात रंजूच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला होता आणि त्याला भीती होती की ती दुसऱ्या समुदायातील मुलासोबत पळून जाईल. यावरून वाटेत त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि रंजू आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

हेही वाचा : समीरने 20 वर्षीय गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार केला, गुप्तांगातून रक्तस्त्राव अन्...

मर्डर करुन मृतदेह विहिरीत फेकून दिला

संदीपला माहिती मिळाली की रंजूचा कथित प्रियकर जवळच्याच जंगलात आहे. संदीप तिथे पोहोचला असता, त्याला रंजू आणि तिचा प्रियकर एकत्र दिसले. प्रियकर तिथून पळून गेल्यावर संतापलेल्या संदीपने आपली इज्जत जाईल असा संकुचित विचार करुन रंजूचा गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह एका खोल विहिरीत फेकून दिला आणि स्वतः पोलीस चौकीत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या कृत्याने संपूर्ण कुटुंबाची स्वप्ने धुळीस मिळाली असून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.

पोलीस अधिकारी अंशुमान श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्याला त्वरित ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रंजूचा मृतदेह बाहेर काढला असून, तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता फरार असलेल्या कथित प्रियकराचा शोध घेत असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.