चिमुरड्या खेळत होत्या, 36 तासांतच हात, पाय अन् डोके धडापासून वेगळे आढळले..

Crime News : खेळताना दोन अल्पवयीन चिमुरड्यांचे मृतदेह 36 तासानंतर बुधवारी चिमनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मृतदेह हे छिन्नविछिन्न आढळून आले होते. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला असून तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही मुली या चुलत बहिणी असल्याची माहिती समोर आली. 

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:33 AM • 16 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोघी चिमुरड्या घराजवळ खेळत होत्या

point

काही तासांतच हात, पाय आणि डोके धडापासून वेगळे आढळले

Crime News : बिहारच्या मुजफ्फरपुरच्या रामपुरहारी पोलीस ठाणे क्षेत्रात मकसूदपुर गावात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खेळताना दोन अल्पवयीन चिमुरड्यांचे मृतदेह 36 तासानंतर बुधवारी चिमनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मृतदेह हे छिन्नविछिन्न आढळून आले होते. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला असून तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही मुली या चुलत बहिणी असल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोनं दारूत विष मिसळून नवऱ्याला संपवलं, त्यावरच लिहिलं पुस्तक

दोघी चिमुरड्या घराजवळ खेळत होत्या

मृत मुलींची ओळख ही मौसमी कुमारी (वय 12) आणि रुची कुमारी (वय 7) अशी ओळख समोर आली. कुटुंबियांनी सांगितलं की, दोघी बहिणी या घराजवळ खेळत होत्या. त्याचदरम्यान घरानजीक बख्तौर भूईया बाबाची पूजा सुरु होती, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना वाटले की, मुली देखील तिथेच असतील. रात्र झाली तरी मुलगी घरी परतल्या नाहीत, हे पाहून कुटुंबीय भयभीत झाले. 

काही तासांतच हात, पाय आणि डोके धडापासून वेगळे आढळले

त्यांनी शोधमोहिम सुरुवात केली, मात्र मंगळवारी रामपुरहारी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा एफआरआय दाखल करण्यात आला होता. बुधवारी सकाळी गावातील विटभट्टीजवळील पडीक जागेतून दोन मुलींचे मृतदेह आढळून आले होते. त्यांचे हात, पाय आणि डोके धडापासून वेगळे केलेले होते. मृतदेहाची अवस्था हत्येचा संशय निर्माण करणारी आहे. 

हे ही वाचा : सांगली: 9 महिन्यांचा चिमुकला पाळण्यात झोपी गेला, वादळी वारा आला अन्...

संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि एफएसएल पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हे चित्र पाहून कुटुंबीय स्वत:ला सावरू शकत नव्हते. दरम्यान पोलीस अधिकारी शिवेंद्र नारायण सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली, तेव्हापासून पोलीस शोध घेत होते. मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पुढील तपास सुरु केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल.