आईचे परपुरूषासोबत लिव्ह-इन संबंध, मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले!

मुंबई तक

• 10:53 AM • 02 Jun 2025

delhi crime news : दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या पार्टनरची हत्या केली. ही हत्या महिलेच्या मुलानेच केली असून त्याचं कारण आता समोर आलं आहे.

delhi crime news Mother's live-in relationship with another man sadar bajar

delhi crime news Mother's live-in relationship with another man sadar bajar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत एका तरुणाने आपल्याच आईशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषावर धारदार शस्त्राने हल्ला केला

point

संबंधित प्रकरणाचे कारण ऐकूण आपण थक्का व्हाल

delhi crime news : दिल्लीत एका तरुणाने आपल्याच आईशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. तरुणाने आपल्या मित्राला सोबत घेत हे कृत्य केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना दिल्लीतील सदर बाजार परिसरात घडली आहे. महिला आणि पुरूष हे दोघेही लिव्ह ईनमध्ये राहत होते. यामुळे महिलेच्या मुलाने हे कृत्य केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : कोकणासह रायगड, रत्नागिरीत पाऊस घालणार थैमान! 'या' जिल्ह्यांमध्ये वाहणार सोसाट्याचा वारा

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 23 वर्षीय गौरव नबी करीम परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं होतं. आरोपीची आई रजनी ही धर्मेंद्र नावाच्या एका पुरुषासोबत दिल्लीतील सदर बाजार परिसरात लिव्ह इनमध्ये राहत होती. याबाबत तिने परपुरूषासोबत विवाह करणार असल्याचं सांगितलं होतं. 

दरम्यान, धर्मेंद्र हा रजनीला मारहाण करायचा, अशी माहिती लेक गौरवला होताच त्याने बुधवारी रात्री गौरवने आपल्या ललित नावाच्या मित्राला सोबत घेतलं. त्यानंतर तो आपल्या आईच्या घरी पोहोचला आणि त्याने धर्मेंद्रवर चाकूने वार करत त्याची हत्या केली. या हत्येनंतर गौरव आणि ललित हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी रजनीच्या घरातून बाहेर रक्त येताना पाहिले असता, संबंधित प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, मृत व्यक्ती हा धर्मेंद्र असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींची ओळख पटली आहे. दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत गजाआड घातलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

हेही वाचा : मुंबई-ठाण्यात धडकणार वादळी वारे, पाऊसही धुमाकूळ घालणार? कसं असेल आजचं हवामान?

दरम्यान, दिल्लीमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत असतात. गुन्हेगारी, लैंगिक अत्याचारांचं दिल्ली हॉट्सस्पॉट बनलं. यामुळे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन अकार्यक्षम ठरतंय का? असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.