मुंबई-ठाण्यात धडकणार वादळी वारे, पाऊसही धुमाकूळ घालणार? कसं असेल आजचं हवामान?
Mumbai-Thane Weather Today : मुंबईत 26 मे 2025 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने धुकाकूळ घातला होता. त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत पाऊस धो धो कोसळणार का?
आजचं मुंबईतील तापमान कसं असेल?
जाणून घ्या मुंबई आणि ठाण्यातील आजच्या हवामानाबाबत
Mumbai-Thane Weather Today : मुंबईत 26 मे 2025 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने धुकाकूळ घातला होता. त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. परंतु, मागील दोन दिवसापासून मुंबईत पावसाने थोडी विश्रांती दिली आहे. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरु आहे. मुंबईत जून महिना हा मान्सूनच्या आगमनाचा काळ असतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे की, 2025 मध्ये मान्सून नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात (साधारण 8 ते 11 जून) मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 2 जून 2025 रोजी मान्सूनपूर्व पावसाची (pre-monsoon showers) शक्यता आहे, परंतु पूर्णपणे मान्सून सुरू झाला नसेल.
मुंबईत कसं असेल आजचं हवामान?
तापमान:
कमाल तापमान: ३२ ते ३४°C च्या आसपास राहण्याची शक्यता.
किमान तापमान: २५ ते २७°C च्या आसपास.
जूनच्या सुरुवातीला मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असते, परंतु मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात किंचित घट होऊ शकते.










