कोकणासह रायगड, रत्नागिरीत पाऊस घालणार थैमान! 'या' जिल्ह्यांमध्ये वाहणार सोसाट्याचा वारा
Maharashtra Weather : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. यानंतर सोमवारी (2 जून) रोजी मान्सूनचा प्रभाव संपूर्ण राज्यात कायम राहणार आहे. पावसाचा जोर हा प्रत्येक ठिकाणानुसार बदलण्याची शक्यता असून याबाबतची एकूण माहिती घ्या जाणून.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ
'या' भागांना हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
Maharashtra Weather : देशात यंदा मान्सूनने 10 - 12 दिवसापूर्वीच म्हणजेच 26 मे रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली. यानंतर हवामान खात्याने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला होता. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. यानंतर सोमवारी (2 जून) रोजी मान्सूनचा प्रभाव संपूर्ण राज्यात कायम राहणार आहे. पावसाचा जोर हा प्रत्येक ठिकाणानुसार बदलण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पोहताना दम भरला, गटांगळ्या खाल्ल्या, चौघांचा तलावात बुडून मृत्यू
2 जून रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मान्सून हलका ते मध्यम स्वरुपाचा आहे. तसेच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दिवशी वातावरण ढगाळ राहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
कोकणात या भागात मुसळधार पाऊस
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात 2 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 100 - 150 मिमी पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. सखल भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होईल. तर कोकणाला समुद्र जवळ असल्याने पावसाचा वेग वाढू शकेल. याचा परिणाम हा कोकणातील ग्रामीण भागातील शेतीवर होईल.










