लग्न ठरलेल्या प्रेयसीला धमकी द्यायला गेला अन् फसला, 24 वर्षीय तरुणासोबत काय झालं?

मुंबई तक

• 11:05 AM • 05 Jun 2026

प्रेम प्रकरणाची एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीसोबत मिळून स्वतःच्याच प्रियकराची निर्घृण हत्या केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लग्न ठरलेल्या प्रेयसीला धमकी द्यायला गेला अन् फसला,

point

24 वर्षीय तरुणासोबत काय झालं?

Crime News : प्रेम प्रकरणाची एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सामान्यतः प्रेमी युगुल एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला आपल्या मार्गातून हटवण्याचा कट रचतात, परंतु या प्रकरणात एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीसोबत मिळून स्वतःच्याच प्रियकराची निर्घृण हत्या केली. 31 मे दामोदर नदीच्या किनाऱ्यावरील स्मशानभूमीजवळ एका युवकाचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मृत युवकाची ओळख 24 वर्षीय दिलशाद अन्सारी म्हणून पटली होती. झारखंडच्या धनबादमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध

या दुर्दैवी हत्याकांडामुळे दोन कुटुंबांतील आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकाकुळ झाले. विशेष म्हणजे, मृत दिलशाद आणि त्याची प्रेयसी कोमल या दोघांचेही लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरले होते आणि दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, लग्नाची सनई वाजण्यापूर्वीच या प्रेम कथेचा रक्तरंजित शेवट झाला. डीएसपी पी. सी. महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे लव्ह ट्रँगल आणि लग्नाआधी उद्भवलेला वाद हेच मुख्य कारण होते. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, कोमल आणि दिलशाद यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात कोमलचे लग्न रोशन याच्याशी ठरले होते.

हे ही वाचा : केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

जुन्या व्हिडिओची भीती

लग्नाची तारीख ठरल्यानंतर कोमलला दिलशादसोबतचे आपले जुने संबंध संपवायचे होते, मात्र दिलशाद या गोष्टीसाठी तयार नव्हता. तपासादरम्यान अशीही माहिती समोर आली आहे की, दिलशाद कोमलला त्यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणी कमालीच्या मानसिक तणावाखाली होती आणि यावरूनच दोघांमधील वाद दिवसेंदिवस अधिकच वाढत गेला. अखेर या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी कोमलने तिचा होणारा पती रोशन याच्यासोबत मिळून दिलशादच्या हत्येचा कट रचला.

हे ही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?

'अशी' केली हत्या

ठरलेल्या योजनेनुसार, दिलशादला एका स्मशानभूमीजवळ बोलावण्यात आले. तिथे त्याला आधी दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. त्याची हत्या करुन दोघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपी तरुणीला (कोमल) अटक केली आहे. तिच्या चौकशीनंतर आणि तिने दाखवलेल्या जागेवरून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास करत आहेत.