एक्स बॉयफ्रेंड भेटला अन् घडलं भयानक, वकील महिलेने 6 वर्षीय लेकीला का संपवलं?

एका आईने आपल्या पाच वर्षाच्या चिमुरड्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आपल्या प्रियकरासोबत मिळून तिने ही हत्या केली.

Crime News

Crime News

मुंबई तक

07 Jun 2026 (अपडेटेड: 07 Jun 2026, 10:41 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक्स बॉयफ्रेंड भेटला अन् घडलं भयानक

point

वकील महिलेने केली पोटच्या 6 वर्षीय चिमुरडीची हत्या

Crime News : एका आईने आपल्या पाच वर्षाच्या चिमुरड्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आपल्या प्रियकरासोबत मिळून तिने ही हत्या केली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येचा उलगडा मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर झाला. वेन्नीला असं चिमुरडीचं नाव आहे. 24 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिचे वडील प्रवीण यांनी पोलिसांत धाव घेत आपली पत्नी प्रियांका आणि तिचा कथित प्रियकर मोहन यांच्यावर मुलीच्या हत्येचा संशय व्यक्त केला. कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

जुन्या मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि  प्रियांका यांचा 2007 मध्ये विवाह झाला होता. या दांपत्याला 17 आणि 5 वर्षांच्या दोन मुली आहेत. प्रियांका वकील आहे. प्रियांकाची काही वर्षांपूर्वी तिचा कॉलेजमधील प्रियकर मोहन याच्याशी पुन्हा भेट झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर ते एकत्र राहू लागले होते. या प्रेमसंबंधांमुळे पती-पत्नीत वाद निर्माण झाले होते आणि प्रियांकाने प्रवीण यांच्याकडे घटस्फोटाची मागणीही केली होती. मोहनसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागल्यानंतर प्रियांका आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन जात असे.

हे ही वाचा : डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् दगडानं ठेचलं डोकं, बॉडी बिल्डरला क्रूरपणे संपवलं; बायकोसोबत...

मृत्यूच्या वेगवेगळ्या कारणांमुळे संशय

24 मार्च रोजी झालेल्या चिमुरडीच्या अचानक मृत्यूबाबत विचारले असता, प्रियांकाने कुटुंबीयांना वेगवेगळ्या आणि संशयास्पद कहाण्या सांगितल्या. एका प्रसंगी तिने मुलीला बिर्याणी खायला घातल्याचे सांगितले, तर दुसऱ्या वेळी तिने मुलीला आईस्क्रीम देऊन वातानुकूलित (AC) कारमध्ये झोपायला ठेवल्याचा दावा केला. नंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यावर मुलगी मृत अवस्थेत आढळल्याचे तिने सांगितले. प्रियांकाच्या या बदलत्या विधानांमुळे कुटुंबीयांचा संशय बळावला.

हे ही वाचा : उच्चभ्रू सोसायटीत एकट्या राहणाऱ्या महिला प्रोफेसरला कुणी संपवलं?

प्रियकर अटकेत, प्रियांका फरार

दरम्यान, वडील प्रवीण यांनी मुलीचा शवविच्छेदन (Post-mortem) अहवाल परदेशात डॉक्टर असलेल्या आपल्या एका नातेवाईकाला दाखवला. या अहवालाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर, मुलीला मारहाण करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय बळावला. यानंतर प्रवीण यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी मोहन याला अटक केली असून, मुख्य आरोपी प्रियांका सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा असून पुढील तपास सुरू आहे.