Navi mumbai Crime : मॅट्रिमोनियल साईटवर भेट, महिलेला भुलवून घेऊन गेला हॉटेलवर; नंतर…

रोहिणी ठोंबरे

• 06:11 AM • 06 Nov 2023

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नवी मुंबईतील एका 33 वर्षीय महिलेशी मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्क साधला. यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने महिलेला भेटण्यासाठी अनेक ठिकाणी बोलावून तिच्यावर बलात्कार केला.

Navi mumbai Crime Met on matrimonial site accused tricked woman and took her to hotel Later he raped and made obscene videos

Navi mumbai Crime Met on matrimonial site accused tricked woman and took her to hotel Later he raped and made obscene videos

follow google news

Crime News : दिवसेंदिवस आपल्या आसपासच्या परिसरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. महिलांसाठी असलेल्या सुरक्षेवरही या घटनांनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असंच एक प्रकरण नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात घडलं आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नवी मुंबईतील एका 33 वर्षीय महिलेशी मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्क साधला. यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने महिलेला भेटण्यासाठी अनेक ठिकाणी बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Navi mumbai Crime Met on matrimonial site accused tricked woman and took her to hotel Later he raped and made obscene videos)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या या 33 वर्षीय महिलेने सिंगापूर येथे राहणाऱ्या या व्यक्तीला मॅट्रिमोनियल साईटवर (Matrimonial Site) पाहिले होते. यानंतर दोघांनी लग्नासाठी संपर्क केला. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आरोपीने महिलेशी लग्नाची बोलणी करून तिला अनेक ठिकाणी भेटायला बोलावले.

वाचा: ST Bus Strike: गुणरत्न सदावर्तेंमुळे CM शिंदेंचं ऐन दिवाळीत वाढणार टेन्शन?

महिलेने तक्रारीत आरोप केला आहे की, डिसेंबर 2020 ते मार्च 2023 या कालावधीत आरोपीने तिला नवी मुंबई, मुंबई आणि सिंगापूर येथील लॉज आणि हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले, जिथे तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला.

आरोपीने अश्लील फोटो काढत व्हिडीओही बनवले

पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा आरोपीशी मॅट्रिमोनियल साईटवर संपर्क झाला होता. आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले. याच बहाण्याने आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटीसाठी बोलावले होते.

वाचा: Crime : मोबाईलमधील अश्लील फोटोमुळे आत्महत्येचं उलगडलं गूढ; सांताक्रुझमधील ‘ते’ प्रकरण काय?

आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हिडीओही बनवले होते. याप्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास करण्यात येत आहे. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

    follow whatsapp