Pune Crime : पुणे जिल्ह्यातील रांजणगावात परिसरात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह जाळलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. तिघांची हत्या करुन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात मृतदेह जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Pune Crime : 'पांढऱ्या पायाची, जा तुझ्याबापाकडून कार...' वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण
महिलेसह दोन लहान मुलांचा मृतदेह पेटवला
पुणे-आहिल्यानगर महामार्गावर असणाऱ्या रांजणगाव खंडाळे परिसरातील एका ग्रोव्हल कंपनी मागे एका महिलेसोबत दोन लहान मुलांचे मृतदेह आढळूल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिघांचीही ओळख अद्यापही पटलेली नाही. मृत पावलेल्या महिलेचं वय हे अंदाजे 25-30 असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्या महिलेच्या उजव्या हातावर जय भीम असं लिहिलं असल्याची माहिती एका वृत्तमाध्यमाने दिली आहे. अशातच तिच्यासोबत असणाऱ्या मुलाचं वय चार वर्षे तर दुसऱ्या मुलाचं वय दीड वर्षे असल्याची माहिती एका वृत्तमाध्यमाने दिली.
गुन्हेगारांचा शोध सुरु
या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत पुढील तपास सुरु ठेवला आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ही हत्या नेमकी कोणी केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस आरोपीची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात आहेत.
या घटनेमुळे रांजणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी पोलिसांनी रहिवाशांना आवाहन केलं की, जर या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीवर संशय बळावला तर रांजणगाव पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती कळवाली. अशातच आता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि पुरावे गोळा केले आहेत.
हेही वाचा : विकृतीचं टोक गाठलं! तरूणानं शारिरीक भूक भागवण्यासाठी थेट घोड्यावरच... घटना नेमकी काय?
दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहे. या खूनामुळे घटनास्थळी आणि वसाहतीच्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊ असे आश्वासनही दिले आहेत.
ADVERTISEMENT
