'सोनमचे तर मुलींशी संबंध...', राजा रघुवंशीच्या ज्योतिषाचार्यांनी खळबळच उडवली!

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 05:28 PM)

Raja Raghuwanshi crime : राजा रघुवंशीबाबत ज्योतिषाने एक धक्कादायक दावा केला. ज्योतिष म्हणाले की, सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. दरम्यान, ज्योतिषाने आतापर्यंत केलेले सर्व दावे हे खरे आहेत. 

raja raghuwanshi crime case in big twist

raja raghuwanshi crime case in big twist

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट

point

सोनमचे मैत्रिणीशी समलैंगिक संबंध?

Raja Raghuwanshi crime : राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणात मेघालय न्यायालयाने गुरूवारी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. शिवाय, इतर आरोपी आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अशातच ज्योतिषाने राजा रघुवंशीबाबत एक धक्कादायक दावा केला. ज्योतिष म्हणाले की, सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. दरम्यान, ज्योतिषाने आतापर्यंत केलेले सर्व दावे हे खरे आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : हनिमूनच्या दिवशी पती जवळ आला, तेव्हाच पत्नीला झाली पुतण्याची आठवण अन्...

राजाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, ज्योतिषी अजय दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. राजा रघुवंशी हत्याकांडात ज्योतिषी म्हणाले की, राजाच्या कुटुंबाने राजाची कुंडली सोनमच्या कुंडलीशी जुळवली असता, काही अंशी खरी परिस्थिती समोर आली. 

राजाच्या कुटुंबाचे प्रश्न आणि ज्योतिषाची उत्तरे

ज्योतिषानं राजाच्या कुटुंबाला प्रश्न केला की, राजाची हत्या झालीये, त्याची पत्नी सोनम कुठे आहे?

त्यावर पंडित यांनी उत्तर दिलं की, सोनम जिवंत आणि सुरक्षित आहे. 

त्यानंतर सोनम कुठे आहे? असा प्रश्न केला.

त्यावर ज्योतिषाने ती उत्तरेकडील दिशेला असल्याचं उत्तर दिलं. 

हत्येच्या कटात कोण सामील होते? 

या प्रश्नाचं उत्तर देताना ज्योतिषाने सांगितलं की, तीन ते चार पुरूष आणि एक महिला सामील होते. 

ती महिला कोण आहे? 

त्यावर जोतिषाने तुमची सून असे सांगितलं. 

हेही वाचा : मुंबई हादरली! 10 वर्षाच्या मुलीवर आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत व्हिडिओ बनवला

ज्योतिषाचा मोठा दावा

दरम्यान, ज्योतिषाने मोठा दावा करत सांगितलं की, या हत्येप्रकरणात आणखी एका महिलेचा समावेश आहे. त्यांनी  सांगितलं की, लवकरच दुसऱ्या एका महिलेबाबतची माहिती समोर येईल. दुसरी तरुणी ही सोनमचीच मैत्रीण असण्याची शक्यता आहे. तिचे आपल्या मैत्रिणीसोबत समलैंगिक संबंध असू शकतात. तिच्या कुंडलीवरून असंच दिसून येतंय, असा ज्योतिषाने दावा केला आहे.