Mumbai Crime News: मुंबईतील मालवणी परिसरात माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यावेळी एक 30 वर्षीय महिला आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराला एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि नंतर हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, यामधील पिडीत मुलीला मुंबईतील मालवणी जनकल्याण परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेव्हाच या सबंध घटनेचा खुलासा झाला. तिथल्या डॉक्टरांनी उपचारादरम्यान, मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र, मुलीच्या गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याचं मेडिकल टेस्ट्समधून समोर आलं. यानंतर, रुग्णालयाच्या प्रशासनाने पोलिसांना याबद्दल कळवले. त्यावेळी पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.
हे ही वाचा: भाजीविक्रेता ते नेता, जेलवारी ते मंत्रिपद, अनेकदा चढ उतार... छगन भुजबळांचा राजकीय प्रवास
पोलीस तपासात काय आलं समोर?
मुलीच्या आईचे एका 19 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तसेच, आरोपी महिलेचा म्हणजेच त्या मुलीच्या आईचा तीन वर्षांपूर्वीच तिच्या पतीसोबत घटस्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचं समोर आलं. घटस्फोट झाल्यानंतर तिने तिच्या मुलीला जन्म दिला आणि याच काळात तिचं एका 19 वर्षीय मुलावर प्रेम जडलं. कालांतराने तिचे आणि आरोपी मुलाचे प्रेमसंबंध वाढू लागले. दरम्यान, आरोपी महिला ही तिच्या आईच्या घरी राहत असल्याचं कळालं. तसेच एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 18 तारखेच्या रात्री आरोपीने आईसमोरच तिच्या मुलीवर बलात्कार केला.
हे ही वाचा: छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?
आईच्या समोरंच केला बलात्कार
यावेळी ती मुलगी वेदनेमुळे खूप किंचाळत होती, मात्र तिच्या आईने मुलीची काहीच मदत केली नाही. मुलीची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात नेले परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यादरम्यान आरोपी महिलेने मुलीला भुवळीचा त्रास असल्याचं सांगून डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी याबाबतीत पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्धा तक्रार दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेचा तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
