अलिगढ: जेव्हा कोणी एखाद्याच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीला दुसरं काहीही सुचतं नाही. त्यामुळे अनेकांची आधीपासू असलेली नाती देखील तुटतात. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे असेच काहीसे दिसून आले. येथे एक महिला तिच्या दिराच्याच प्रेमात पडली. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. पण दुसरीकडे ती महिला तिच्या पतीवर चिडचड करू लागली आणि त्याला कायमचा आपल्या मार्गातून दूर करण्याचा तिने कट रचला. एके दिवशी तिने तिच्या दिराला बोलावलं आणि म्हटलं की, "ऐक, माझ्या पतीला आपल्या मार्गातून हटवायचं आहे." मग दोघांनी मिळून त्याची हत्या केली.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
ही घटना नागला हिमाचल गावातील आहे, जिथे 17 जूनच्या रात्री 30 वर्षीय ट्रक चालक ऋषी कुमारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 18 जूनच्या सकाळी ऋषी कुमारचा मृतदेह गावातील त्याच्या काकाच्या घरापासून काही अंतरावर आढळून आला. ऋषीवर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली होती. सुरुवातीला पत्नी ललिताने आरोप केला होता की, गावातील एका व्यक्तीने मोबाइल चोरीच्या संशयावरून ऋषीला धमकावले होते आणि त्याच शत्रुत्वामुळे त्याने ऋषीची हत्या केली असावी.
हे ही वाचा>> हॉटेलमध्ये मोठा कांड! खिडकीवर पडदा नव्हता, लोकांनी सगळंच पाहिलं..कपलचा प्रायव्हेट Video लीक
पोलीस तपासात भलतचीच गोष्ट झाली उघड
तपासादरम्यान, पोलिसांना ललिताच्या वक्तव्यांवर संशय आला. चौकशीदरम्यान असे उघड झाले की, ललिताचे लग्नापूर्वीच ऋषीच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे नाते सुरू राहिले. हीच गोष्ट ऋषीलाही समजली. पोलिसांच्या माहितीनुसार, ललिता आणि तिचा प्रियकर (जो मृताचा चुलत भाऊ आहे) यांनी मिळून ऋषीचा खून करण्याचा कट रचला आणि तो अंमलात आणला.
हत्येच्या रात्रीचे सत्य
ललिताने सांगितले की त्यांच्या घरात शौचालय नाही. 17 जूनच्या रात्री तिला अतिसाराची तक्रार आली. म्हणून तिचा पती तिला रात्री 11.30 वाजता काका सौदन सिंग यांच्या घरी सोडून गेला. ती तिच्या आठ महिन्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन गेली. पण इथेच ऋषीच्या हत्येचं सगळं प्लॅनिंग पार पडलं होतं.
हे ही वाचा>> मुलाची होणारी पत्नी प्रचंड सुंदर, सासऱ्याची नियत ढळली.. नको ते केलं अन् घरात बायको म्हणूनच...
कौटुंबिक परिस्थिती
ऋषी हा तीन भावांमध्ये मोठा होता आणि तो ट्रक ड्रायव्हर होता. त्याच्या आईवडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. तो हरियाणामध्ये काम करत होता आणि त्याच्या काकाच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गावात आला होता.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की ललिताचेच दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळेच ही हत्या झाली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि लवकरच सर्व गुन्हेगार पकडले जातील असा दावा करत आहेत.
ADVERTISEMENT
