solapur crime news : बापाने आपल्याच लेकीचा गळा दाबून तिची हत्या करत तिला पुरल्याची घटना उघडकीस आली. नराधम बाप इथवरंच न थांबता त्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणाचे खरे सत्य समोर आले आहे. ही घटना सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील आहे. आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुलीची हत्या करण्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. मृत मुलीच्या बापाचे त्याच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध त्याच्या मुलीने पाहिले असता, निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विकृतीचं टोक गाठलं! तरूणानं शारिरीक भूक भागवण्यासाठी थेट घोड्यावरच... घटना नेमकी काय?
वडिलांना आपल्या लेकीला मारल्याचं सांगितलं आहे. 'मीच गळा दाबून तिला पुरलं', असल्याचं नराधम म्हणाला आहे. दरम्यान, मृत मुलीचे नाव श्रावणी ओगासिद्ध कोठे असं होते. श्रावणी ही 9 वर्षांची होती. दरम्यान, हत्या करणाऱ्या आरोपींला दोन मुली आणि एक मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. इतर मुलं ही आजोळी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नराधम बापाचे त्याच्याच आईसोबत अनैतिक संबंध होते. हेच संबंध त्याच्या मुलीने पाहिले होते. याबाबत कोणालाही तपास होऊ नये यासाठी बापाने लेकीला संपवलं. त्यानंतर आपल्या लेकीला फिट आल्याचे खोटे कारण सांगून तिचा मृत्यू झाला असल्याचं नराधम बापाने सांगितलं. या घटनेविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103,238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा खुलासा कसा झाला?
ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी श्रावणी ही वडिलांजवळ झोपली होती. अशावेळी आरोपी बापाने तिचा गळा दाबला आणि तिची हत्या करत तिला पुरलं. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा रेवणसिद्ध कोठे यांनी आपली नात श्रावणी कुठं आहे? असा सवाल केला. त्यानंतर गावातही तिची चौकशी केली. मात्र, श्रावणीचा तपास लागला नाही.
हेही वाचा : दोन गाड्या, दोन पिस्तूल, चांदीची भांडी... वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
अशावेळी नातेवाईकांच्या लक्षात आले की, घराशेजारीच खोदकाम केल्याचं दिसून आलं. मातीत पायांचे काही ठसे दिसून आले. अशावेळी गावकऱ्यांचा तिच्या वडिलांवरच संशय बळावला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, पत्नी वनिता कोठे यांनी रेवणसिद्ध कोठेंनीच लेकीला मारल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
