दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध! प्रेमसंबंधात आड येणाऱ्या पतीचा काढला काटा, प्रियकरासोबत मिळून आखला प्लॅन अन्...

एका महिलेने आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

प्रियकरासोबत मिळून आखला प्लॅन अन्...

प्रियकरासोबत मिळून आखला प्लॅन अन्...

मुंबई तक

• 11:07 AM • 02 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेचे दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध!

point

पत्नीने प्रेमसंबंधात आड येणाऱ्या पतीचा काढला काटा

point

प्रियकरासोबत मिळून आखला प्लॅन अन्...

Crime News: अनैतिक प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना ही झारखंडच्या चितरा गावात घडली.

हे वाचलं का?

मृताच्या भावाने नोंदवली तक्रार  

आरोपी महिलेने तिच्या प्रियकर आणि त्याच्या काही साथीदारांसोबत मिळून पतीचा काटा काढला. आरोपींनी पीडित पतीचं आधी अपहरण केलं आणि नंतर, त्याला जंगलात नेऊन त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख संजू भारती (35) अशी असून तो हंटरगंज पोलीस स्टेशन परिसरातील हिरिंग गावाचा रहिवासी होता. 22 नोव्हेंबर रोजी मृताचा भाऊ संजय भारती याने याने संजूची हत्या करण्यात आल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती.

हे ही वाचा: Nagar Parishad Voting LIVE: 'या' जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदानाला झाली सुरूवात, पाहा मतदानाची टक्केवारी...

आरोपी पत्नीने केला गुन्हा कबूल  

पोलिसांकडे तक्रार करताना पीडित तरुणाच्या भावाने म्हणजेच संजयने मृताची पत्नी रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी मिळून संजूची हत्या केल्याचे स्पष्ट आरोप केले होते. आधी संजूचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर आरोपींनी त्याची निर्घृण हत्या केल्याचं संजयने सांगितलं. संजयच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी पीडित संजूचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांना जंगलात संजू भारतीचा मृतदेह आढळला. त्यानंतर, संजूची पत्नी रीता कुमारी हिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. खरं तर, सुरूवातीला तिने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मात्र, कठोर चौकशी केली असता तिने सत्य कबूल केलं. तिने संजूच्या हत्येचा संपूर्ण प्लॅन पोलिसांना सांगितला आणि त्यामध्ये कोणा-कोणाचा समावेश होता, याचा सुद्धा उलगडा केला.

हे ही वाचा: संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO

पोलिसांचा तपास  

आरोपी महिलेच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी घटनेत सामील असलेल्या रिशु कुमार (28) नावाच्या दुसऱ्या आरोपीला अटक केली. त्याची पोलिसांनी कठोर चौकशी केली असता तो सुद्धा संजूच्या हत्येच्या प्लॅनमध्ये सहभागी असल्याचं त्याने कबूल केलं. रिशु कुमारने दिलेल्या कबूलीच्या आधारे, पोलिसांनी संजूचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी हजारीबाग सदर रुग्णालयात पाठवला. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद भारती अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp