Optical Illusion: स्पायडरमॅनच्या खऱ्या गँगमध्ये लपलाय एक खोटा 'SPIDERMAN'; पण कुठे? एका क्लिकवर पाहा

Optical Illusion IQ Test:  सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर सर्वांचाच गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही.

Spiderman Optical Illusion Test

Spiderman Optical Illusion Test

मुंबई तक

08 Jan 2025 (अपडेटेड: 08 Jan 2025, 06:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या या कठिण फोटोला पाहून थक्कच व्हाल

point

फोटोत लपलेल्या खोट्या स्पायडरमॅनला कोण कोण शोधणार?

point

...तरच तुम्हाला दिसेल फोटोत लपलेला खोटा स्पायडरमॅन

Optical Illusion IQ Test:  सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर सर्वांचाच गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही. कारण याच फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी अशाप्रकारे लपलेल्या असतात, ज्या शोधणं भल्या भल्यांना जमत नाही. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत सर्व ठिकाणी खरे स्पायडरमॅन असल्याचं पाहायला मिळत आहे. पण एका ठिकाणी एक खोटा स्पायडर मॅन लपला आहे. हा स्पायडरमॅन शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांचा वेळ दिला गेला आहे. ज्या लोकांकडे हिम्मत असेल, तेच या खोट्या स्पायडरमॅनला शोधू शकतात.

हे वाचलं का?

या फोटोत एकूण 21 स्पायडरमॅन त्यांच्या जबरदस्त पोशाखात असल्याचं दिसतंय. पण स्पायडरमॅनच्या या गँगमध्ये त्यांचा दुश्मन म्हणजेच खोटा स्पायडरमॅन लपला आहे. या खोट्या स्पायडरमॅनला शोधता शोधता अनेकांना घाम फुटला आहे. कारण या फेक स्पायडरमॅनला शोधणं वाटतं तितकं सोपं नाहीय. कारण त्याला शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. 

हे ही वाचा >> What is Mcoca Act : मकोका कायदा नेमका काय? संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्याची का होतेय मागणी?

ज्या लोकांना खऱ्या स्पायडरमॅनच्या लिस्टमध्ये खोटा स्पायडरमॅन शोधण्यात यश आलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेल्या खोट्या स्पायडरमॅनला शोधण्यात यश आलं नाही, त्यांना त्यांच्या बुद्धीला कस लावावा लागेल. खूप प्रयत्न केल्यानंतरही जर हा खोटा स्पायडरमॅन तुम्हाला शोधता आला नसेल, तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. हा खोटा स्पायडरमॅन नेमका कुठे लपला आहे, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फोटोत दुसऱ्या लाईनमध्ये ज्या ठिकाणी रेड सर्कल केलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही लपलेल्या या खोट्या स्पायडरमॅनला पाहू शकता.

हे ही वाचा >> Amar Kale: शरद पवार गटातील 7 खासदारांची अजित पवार गटात होणार एन्ट्री? अमर काळे म्हणाले, "मला फोन आला होता..."

    follow whatsapp