CCTV: शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला जागीच केलं ठार, उल्हासनगर हादरलं!

मिथिलेश गुप्ता

• 06:42 AM • 27 May 2023

Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये 7 ते 8 जणांच्या टोळीकडून शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हत्येनंतर सर्व आरोपी हे फरार झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे.

shinde group ulhasnagar branch chief brutally murdered by 7 to 8 people outside his house thrill captured on CCTV

shinde group ulhasnagar branch chief brutally murdered by 7 to 8 people outside his house thrill captured on CCTV

follow google news

Crime News: उल्हासनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) त्यांच्याच शिवसेना (Shivsena) पक्षाच्या शाखाप्रमुखाची (Shakhapramukh) निर्घृण हत्या झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची काल (26 मे) हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 7 ते 8 जणांच्या एका टोळीने धारधार चाकूने शब्बीरची हत्या केली आहेत. ह्या हल्ल्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले आहे. मात्र, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (shinde group ulhasnagar branch chief brutally murdered by 7 to 8 people outside his house thrill captured on CCTV)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या जय जनता कॉलनी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख हा घराबाहेर उभा असताना अचानक आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळीने धारधार चाकूने शब्बीरवर सपासप वार केले. हा अचानाक झालेला हल्ला एवढा भयंकर होता की, ज्यामध्ये शब्बीरचा जागीच मृत्यू झाला.

शब्बीरला रक्ताच्या थारोळ्यातच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवून दिलं. ही हत्या विक्रम कवठणकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे ही वाचा >> Sangli: मामीने मांत्रिकाकडे नेलं, भाच्याचा जीवच गेला; असं घडलं तरी काय?

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचं संशय पोलिसांनी वर्तवला आहे. ह्या हत्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे, ह्या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे, मधुकर कड, राजेंद्र कोते यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी धारधार चाकू देखील जप्त केले आहेत. तसेच आरोपीच्या अटकेसाठी उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले असून, हत्याचे नेमकं कारण अद्यापही समोर आला नाही. मात्र शब्बीर शेख हा शिवसेनेच्या शिंदे गटाचा शाखाप्रमुख होता. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. मात्र, स्थानिकांच्या मते, शब्बीर हा मटक्याचा व्यवसाय करायचा. त्यामुळे उल्हासनगरमध्ये शब्बीर शेखची ‘मटका किंग’ म्हणून ओळख आहे. याच व्यावसायिक वादातून ही हत्या झाली असू शकते अशी सध्या चर्चा आहे. मात्र, नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण ह्या घटनेनंतर जय जनता कॉलनीमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

हे ही वाचा >> Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात चाललंय तरी काय?

ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ 3 आणि परिमंडळ 4 मध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांनी डझनभर पेक्षा जास्त गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई केली आहे. मोक्का अंतर्गत देखील कारवाई केली आहे. मात्र, तरी देखील शहरातील गुन्हेगारी ही वाढतच असल्याचं दिसून येत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात चाललंय तरी काय? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

    follow whatsapp