Delhi Blast: दिल्ली स्फोटात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मी स्वत...'

Amit Shah Reaction on Delhi Blast: राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा अमित शाह नेमकं काय म्हणाले.

10 people killed in blast near red Fort in delhi see amit shah first reaction

Amit Shah

मुंबई तक

10 Nov 2025 (अपडेटेड: 10 Nov 2025, 10:20 PM)

follow google news

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी घडलेल्या भीषण कार स्फोटात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 24 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी घटनेबाबत प्राथमिक माहिती दिली.

हे वाचलं का?

दिल्ली स्फोटाबाबत अमित शाह नेमकं काय म्हणाले?

'लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ i20 Hyundai गाडीमध्ये एक स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या काही गाड्या आणि त्याच रस्त्याने जाणाऱ्या काही लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचंही समजतं आहे.' 

'स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटातच दिल्ली क्राइम ब्रँच, दिल्ली स्पेशल ब्रँच यांच्या टीम घटनास्थळी पोहचल्या. NSG आणि NIA च्या टीम FSL सह कसून तपास करत आहेत. आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.'

हे ही वाचा>> राजधानी दिल्ली हादरली.. लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू, मुंबईत हायअलर्ट जारी

'मी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा झाली आहे, स्पेशल ब्रँचच्या  तपास अधिकाऱ्याशी देखील चर्चा झाली आहे. हे दोघेही आता घटनास्थळी आहेत. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत. सर्व शक्यता लक्षात घेऊन या स्फोटाची सखोल चौकशी करू.' 

'चौकशीअंती जी माहिती समोर येईल ती आम्ही जनतेसमोर ठेऊ. मी काहीच वेळात घटनास्थळी जात आहे आणि दवाखान्यात देखील तात्काळ जाणार आहे.' अशी माहिती अमित शाह यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा>> दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला? कारच्या उडाल्या ठिकऱ्या, 5 महत्त्वाच्या अपडेट्स समोर

घटनेची पार्श्वभूमी

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गेट नंबर 1 जवळ आज संध्याकाळी सुमारे 6.52 वाजता एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि २४ हून अधिक जण जखमी झाल्याचे अहवाल आहेत. स्फोट इतका प्रचंड होता की त्यामुळे जवळच्या वाहनांना आग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली अग्निशमन दलाने घटनास्थळी सात अग्निशमन वाहने आणि 15 CAT एम्ब्युलन्स तात्काळ पाठविण्यात आल्या.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका तीव्र होता की, त्याचा धक्का लांबवर जाणवला आणि दूरवरच्या परिसरातील काचा देखील फुटल्या. दिल्ली पोलीस, एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. आतापर्यंत स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नसले तरी हे एक नियोजित हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    follow whatsapp