BEST Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईतल्या निवडणुकीत कशामुळे झाला एवढा दारूण पराभव?

Thackeray Brothers: मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा अत्यंत दारूण असा पराभव झाला. जाणून घ्या हा पराभव नेमका कसा झाला.

best election why did thackeray brothers alliance suffer such a crushing defeat in the mumbai elections

Thackeray Brother

मुंबई तक

20 Aug 2025 (अपडेटेड: 20 Aug 2025, 06:59 PM)

follow google news

अतिक शेख, मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांना पहिलाच मोठा  राजकीय धक्का यावेळी बसला आहे. कारण युती म्हणून निवडणूक लढविणाऱ्या या दोन पक्षांना पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे भावांनी उत्कर्ष नावाचं पॅनल रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने सगळ्या 21 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पण त्यापैकी एकाही जागेवर ठाकरेंच्या उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. 

हे वाचलं का?

शशांक राव यांच्या पॅनलला 14 आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलला 7 जागा मिळाल्यात. त्यामुळं ठाकरे बंधूंच्या पॅनलचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. पण ठाकरे भावांच्या पॅनलचा पराभव कसा आणि का झाला हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा>> बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल.. साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका

दरम्यान, या पराभवावर बेस्टच्या कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी प्रतिक्रिया देताना पाहा नेमकं काय म्हटलंय.

बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये आमचा पराभव झाला पण जे जिंकले त्यांचं अभिनंदन. आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं? बारा हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव झाला. प्रचंड पैशाचा ओघ मागील आठवड्याभरापासून पाहायला मिळाला. आम्हाला वाटलं की, कर्मचारी पैसे घेतील मात्र मतदान आम्हाला करतील. पैशाच्या समोर आम्ही कमी पडलो. बेस्ट वाचण्यासाठी मी प्रयत्न केले. भाजपने पैसा लावला आपल्या अधिकाराचा वापर केला. आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो. मला आश्चर्य वाटतं की भाजप सारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवे त्यासाठी हे सगळं करतात यासाठी कौतुक त्यांचं करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे.

हे ही वाचा>> ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या युतीनंतरची पहिलीच निवडणूक

  • युतीच्या पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला 
  • बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युती हरली
  • पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का
  • शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी एकत्र प्रचार केला
  • आदित्य ठाकरे, संदीप देशपांडेंनी धुरा संभाळली
  • शिंदे गटाच्या बबिता पवारांना दिलेल्या प्रवेशाचीही चर्चा
  • राजकीय समीकरणं बांधूनही ठाकरेंच्या युतीचा पराभव

कुणाच्या पॅनलने किती जागा जिंकल्या?

  • शशांक राव पॅनल- 14
  • प्रसाद लाड पॅनल- 07
  • ठाकरे बंधूंचं पॅनल- 00

बेस्ट पतपेढी निवडणूक इतकी महत्त्वाची का होती?

  • उद्धव ठाकरेंचं बेस्ट पतपेढीवर एकहाती वर्चस्व होतं
  • गेल्या 9 वर्षांपासून ठाकरेंची माणसं पतपेढीवर होती
  • बेस्ट पतपेढीवर ज्याची सत्ता त्याची कामगार संघटना बळकट, असं समीकरण
  • कामगार संघटनासोबत असल्याचा फायदा पालिकेत होतो
  • बेस्ट पतपेढीत हरल्यानंतर ठाकरे पालिकेत कोणती रणनीती आखणार?

निवडणुकीत नेमकं काय झालं?

  • गेल्या 9 वर्षांपासून ठाकरेंकडे होती सत्ता
  • शिवसेना यूबीटीने 19 तर मनसेने 2 जागा लढल्या
  • निवडणुकीत लाडांनी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप

सत्ता कुणाची येऊ शकते?

  • शशांक राव यांचे भाजपशी चांगले संबंध
  • लाड आणि राव यांच्या पॅनलची सत्ता होऊ शकते
  • ठाकरे गटाने तब्बल 9 वर्षानंतर सत्ता गमावली

    follow whatsapp