Bihar Chief Minister: भाजपला आता JDU ची गरज लागणार नाही, बनवू शकतात स्वत:चाही मुख्यमंत्री... नेमकं गणित समजून घ्या!

बिहार विधानसभा निवडणुकीत NDA चा प्रचंड मोठा विजय झाला. पण ज्यामध्ये JDU ने अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पण असं असलं तरी यापुढे भाजप JDU शिवाय देखील स्वत:चं सरकार स्थापन करू शकतं. नेमकं कसं त्याबाबतचं गणित समजून घ्या.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:47 PM • 14 Nov 2025

follow google news

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (14 नोव्हेंबर) जाहीर झाले असून त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने प्रचंड बहुमत मिळवले आहे. एनडीएने 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड)  JDU ला 84 जागा मिळाल्या आहेत. मात्र, या निकालात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. तो म्हणजे एवढ्या जागा मिळवून देखील नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष (BJP)ला तब्बल 90 जागांवर विजय मिळाला असून ते जेडीयूशिवाय देखील इतर मित्रपक्षांच्या मदतीने स्वतंत्रपणे सरकार स्थापन करू शकतता. याच सगळ्या समीकरणाबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हे वाचलं का?

बिहारमध्ये भाजप नितेश कुमार यांच्या मदतीशिवाय देखील आता त्यांचं सरकार स्थापन करू शकतं. याबाबत विश्लेषकांच्या मत आहे की, हे शक्य होईल, पण ते धोकादायक आणि अस्थिर असू शकते.

हे ही वाचा>> भाजपची नवखी उमेदवार मैथिली ठाकूर बनली आमदार, दिग्गज नेत्याला चारली धूळ

बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत आणि बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. सध्या भाजप 90 जागा (आघाडी/विजयी) आहेत. तर जेडीयू 84 जागांवर विजयी झाले आहेत. याशिवाय लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) - एलजेपी(आरव्ही) यांना 21 जागा आहेत. तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) - एचएएम(एस) 4 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा - आरएलएम ४ जागा आणि एनडीएमधील इतर छोटे पक्ष मिळून सुमारे 7-9 जागा आहेत,

एनडीएचे एकंदर आकडे 200 च्या पुढे पोहोचले आहेत, जे 2020 च्या तुलनेत मोठी वाढ दर्शवते. त्यावेळी NDA ला 125 जागा मिळाल्या होत्या पण आता तब्बल 75 हून अधिक जागा वाढल्या आहेत. दुसरीकडे विरोधात असलेल्या आरजेडी, काँग्रेस यांना केवळ 34 जागांपर्यंत मर्यादित ठेवण्यात भाजपला यश आलं आहे.

JDU शिवाय भाजपची सरकार कसं स्थापन करू शकते?

जर भाजपने JDU ला बाजूला ठेवले तर त्यांची जागा संख्या कशी असेल? 

  • भाजप: 90
  • एलजेपी(आरव्ही): 19
  • एचएएम(एस): 5
  • आरएलएम: 4
  • इतर पक्ष/अपक्ष: 7-9

एकंदर: सुमारे 118 ते 131 जागा या भाजप आणि घटक पक्षाकडे मिळून आहेत. हे आकडे बहुमताच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे काही अपक्ष आमदार किंवा छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने भाजप 122 चा आकडा सहज गाठू शकतो. उदाहरणार्थ, जर 2-3 अपक्षांनी पाठिंबा दिला तर सरकार स्थापन करणे शक्य आहे. मात्र, हे बहुमत अत्यंत काठावरचं असेल आणि त्यात अस्थिरतेचा धोका आहे, कारण छोट्या पक्ष किंवा अपक्ष कधीही पाठिंबा काढू शकतात.

हे ही वाचा>> भाजप उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला, तरीही बिहारमध्ये लाखाच्या वर मतं मिळवली, दणदणीत विजय

2020 मध्ये जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या होत्या, तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते. आता जेडीयूच्या 84 जागा असूनही, भाजपची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. भाजपचे नेते म्हणतात की, एनडीएचे नेते एकत्रितपणे निर्णय घेतील, पण काही विश्लेषकांच्या मते, भाजपला प्रथमच बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री मिळवण्याची संधी आहे. 

मुख्यमंत्रिपदाची चर्चा

नितीश कुमार यांना पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे का? यावर भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, "एनडीएचे नेते निवडणुकीनंतर निर्णय घेतील, पण नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील." मात्र, पक्षांतर्गत सूत्रांच्या मते, भाजप बिहारमध्ये प्रथमच स्वतःचा मुख्यमंत्री नेमण्याची संधी आहे. त्यामुळे त्याबाबत भाजप स्थानिक पातळीवर याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. कारण हिंदी पट्ट्यात बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपला अद्याप मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. नितीश कुमारांच्या आरोग्याच्या समस्या आणि वयामुळे (74 वर्षे) हा मुद्दा अधिक जटिल होत आहे. 

जेडीयूच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये "नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील" असे म्हटले होते, पण ते लगेच डिलीट करण्यात आले, ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

राजकीय परिणाम

हा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठा विजय आहे. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, "बिहारच्या जनतेने विकास आणि महिलांसाठीच्या योजना निवडल्या." तसेच, "एमवाय फॉर्म्युला (महिला आणि युवा)" चे यश साजरे केले. दुसरीकडे, आरजेडीचे तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे, त्यांच्या आमदारांची संख्या ही 75 वरून थेट 75 पर्यंत घसरली आहे. 

विश्लेषकांच्या मते, जेडीयूशिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे काही दूरगामी परिणाम देखील होऊ शकतात. कारण केंद्रातील सरकारमध्ये जेडीयूच्या खासदारांचा पाठिंबा या गोष्टी देखील भाजपला लक्षात घ्याव्या लागतील. तरीही, सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपकडे काही पर्याय उपलब्ध आहेत, पण ते जोखमीचे आहे.

    follow whatsapp