'नड्डा भेटू नाही तर...' जंतर-मंतरवर जरांगेंची रोखठोक मुलाखत

मुंबई तक

• 08:44 AM • 25 Jul 2026

मनोज जरांगे पाटील यांनी थेट दिल्लीतील जंतर-मंतर गाठून कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

Manoj Jarange At Jantar Mantar CJP Protest

Manoj Jarange At Jantar Mantar CJP Protest

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'नड्डा भेटू नाही तर...'

point

जंतर-मंतरवर जरांगेंची रोखठोक मुलाखत

Manoj Jarange At Jantar Mantar CJP Protest : देशाची राजधानी दिल्लीत विविध शैक्षणिक मागण्यांसाठी आणि पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. "हे कोणत्याही पक्षाचे राजकीय आंदोलन नसून गोरगरीब आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याचा अन् न्यायाचा लढा आहे," असे स्पष्ट मत जरांगे पाटील यांनी मांडले.

हे वाचलं का?

प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ज्या सामान्य जनतेने आणि विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना देशाच्या सत्तेवर बसवले, त्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आज दुर्लक्षित राहिले आहेत. हे आंदोलन मोदीविरोधी नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांचे आहे. परंतु, जर देशाचे पालकत्व असलेल्या पंतप्रधानांनी या मुलांची दखल घेतली नाही, तर त्याला राजकीय वळण लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मोदींनी स्वतः पुढाकार घेऊन किंवा आपले प्रतिनिधी पाठवून विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत.

हे ही वाचा : Inside Story: 'इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह आहात का?', मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना अचानक विचारलं अन्...

उद्योगपतींचे कर्ज माफ, पण...

पेपर फुटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य असल्याचे सांगितले. "एका मंत्र्याचा राजीनामा मागणे म्हणजे सरकारवर दबाव किंवा ब्लॅकमेलिंग नाही. ज्या मंत्र्याच्या कार्यकाळात चूक झाली आहे, त्यांना पदावरून हटवून सरकारने हसतमुखाने जनतेची आणि विद्यार्थ्यांची मागणी मान्य करायला हवी होती. बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारने विद्यार्थ्यांच्या राजीनाम्याच्या मागणीकडे नैतिकतेने पाहायला हवे," अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

हे ही वाचा : Personal Finance: महिन्याला अगदी कमी पैशात सुरू होणाऱ्या ‘या’ 7 गुंतवणुका

मोदी सरकारने प्रतिनिधी पाठवावे

विरोधकांच्या सहभागावरून आणि आंदोलनाच्या राजकीय स्वरूपावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, जर विरोधक इथे येत आहेत आणि सरकारला हे राजकीय वाटत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी आणि केंद्र सरकारने स्वतः इथे येऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत. जेपी नड्डा किंवा इतर कोणीही भेटले तरी विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही; मोदी सरकारने तात्काळ प्रतिनिधी पाठवून सर्व मागण्या मान्य कराव्यात, हेच विद्यार्थी पुन्हा मोदी सरकारचे अभिनंदन करतील, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.