'..तर घरी बसावं लागेल', देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदाराला झाप झाप झापलं

Devendra Fadnavis on Abhimanyu Pawar : “प्रत्येक विषयाचा संबंध लाडकी बहिणीशी जोडू नका. ही योजना बंद होणार नाही. तिची तुलना इतर योजनांशी करता येणार नाही. अध्यक्षांनी दिलेले निर्देश अंमलात आले नसतील तर आता लगेच अंमलबजावणी केली जाईल.”

Devendra Fadnavis on Abhimanyu Pawar

Devendra Fadnavis on Abhimanyu Pawar

मुंबई तक

09 Dec 2025 (अपडेटेड: 09 Dec 2025, 02:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'प्रत्येक विषयाचा संबंध लाडकी बहिणीशी जोडू नका,..तर घरी बसावं लागेल',

point

देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदाराला झाप झाप झापलं

Devendra Fadnavis on Abhimanyu Pawar, Nagpur : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लाडकी बहीण योजनेची चर्चा अजूनही थांबत नाहीये. या योजनेबाबत कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तर कधी पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं. दरम्यान, आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील याच योजनेची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. मात्र, याच योजनेबाबत भाष्य केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना झाप झाप झापलंय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

अभिमन्यू पवार यांनी कोणता प्रश्न मांडला? 

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी दि.9) लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत प्रश्न मांडला. "आमच्या भागातील महिलांना सर्वात मोठी अडचण अवैध दारूच आहे. लाडक्या बहिणींचं हे गंभीर दुःख आम्हाला सांगितलं जातं. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत गृह विभाग आणि अन्न-औषध प्रशासनाला निर्देश दिले होते, तरीही कारवाई दिसत नाही" असं अभिमन्यू पवार म्हणाले. मात्र, यानंतर देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवार यांच्यावर संतापलेले पाहायला मिळाले.

हेही वाचा : मुंबई: दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी, बनावट क्राइम ब्रांच अधिकारी अन्... तब्बल 9.30 लाख रुपये उकळले

देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदाराला झाप झाप झापलं 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा अतिरेक करून उल्लेख केल्याबद्दल स्वतःच्या माजी स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना सर्वांसमक्ष खडे बोल सुनावले. “प्रत्येक विषयात लाडकी बहीण ओढू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावे लागेल,” अशा शब्दांत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला.

अभिमन्यू पवार यांच्या वक्तव्यानंतर तात्काळ प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “प्रत्येक विषयाचा संबंध लाडकी बहिणीशी जोडू नका. ही योजना बंद होणार नाही. तिची तुलना इतर योजनांशी करता येणार नाही. अध्यक्षांनी दिलेले निर्देश अंमलात आले नसतील तर आता लगेच अंमलबजावणी केली जाईल.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नालासोपारा : लपाछपीचा खेळ 8 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला, 4 दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

 

    follow whatsapp