Dhairyasheel Mohite Patil on Jaykumar Gore, सोलापूर : सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवलंय. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वसंत देशमुख यांनी शड्डू ठोकलाय. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीने वसंत देशमुख यांचा अधिकृत उमेदवार म्हणून स्वीकार केलाय. दरम्यान, भाजपचं बिनविरोधचं स्वप्न भंगल्यानंतर पालकमंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. "ज्यांच्याकडे 616 पैकी 16 मतंही नाहीत, त्यांच्या लढाई व्हायचं कारण नाही", असं गोरे म्हणाले होते. आता गोरेंच्या या टीकेला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. जयकुमार गोरे काय म्हणाले होते? आणि मोहितेंनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगितलं, अन्..भयंकर घडलं!
त्यांच्याकडे 616 पैकी 16 मतंही नाहीत - जयकुमार गोरे
जयकुमार गोरे म्हणाले होते की, निवडणूक लागलेली आहे. विरोधासाठी विरोध म्हणून उभे असले तरी भाजप ही निवडणूक गांभीर्याने लढेल. ही निवडणूक भाजपची जिंकेन. फक्त औपचारिकता बाकी आहे. आम्हाला अपेक्षित मताधिक्यांनी आम्ही जिंकू.. बिनविरोध करण्यासाठी काही लोकांशी संपर्क झाला नाही. किंवा त्यांच्याशी मला संपर्क करु वाटला नाही. इथं झारीतला शुक्राचार्य कोणी नाही. निवडणूक वसंत देशमुख लढत आहेत. त्यांच्यामागे कोण आहे, त्यांची ताकद राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिमागे किंवा पुढे कोण आहे? हे बघायचं कार नाही. लोकशाहीमध्ये विरोधक उभा राहिल्यानंतर त्याला कमी समजायचं कारण नाही. आम्ही निवडणूक गांभार्याने लढू. ज्यांच्याकडे 616 पैकी 16 मतंही नाहीत, अशा लोकांशी लढाई व्हायचं कारण नाही. ही लढाई औपचारिकता आहे. आम्ही ती औपचारिकता पूर्ण करु. सगळ्या अदृश्य शक्तींवर माझं लक्ष आहे. त्यांच्यावर लक्ष ठेऊन आम्ही करु, असंही गोरे यांनी नमूद केलं.
हेही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?
धैर्यशील मोहिते पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर
धैर्यशील मोहिते पाटील जयकुमार गोरेंना प्रत्युत्तर देताना म्हणाले, आम्ही आज उमेदवारांना घेऊन सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. घटक पक्षांना घेऊन सोबत जाणार आहोत. लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मी माझ्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेला आदेश मान्य केलाय. पुरोगामी विचार टिकला पाहिजे. त्यादृष्टीने तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. पुरोगामी विचार लोकांमध्ये गेला पाहिजे, असंही ते म्हणाले. तो आदेश मी पाळलाय. पक्षांतर्गत विषय हे आमच्या घरातले प्रश्न आहे. तो आम्ही घरात बसवून मिटवू. घरातील विषय आम्ही चव्हाट्यावर मांडत नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी कोणाचा फोन आला नाही. हुकूमशाही आहे का? आम्ही निवडणूक लढायची नाही का? असा सवालही मोहिते पाटील यांनी केला.
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, या मतदारसंघात 616 मतदार आहेत. मतदारांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि नेत्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे मी वागतोय. आमच्याकडे 616 पैकी 16 मत आहेत का ? असं म्हणत आहेत. मी आता 16 मतांपासून सुरुवात करतो. वसंत देशमुख हे सुधाकरपंत परिचारीक आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत. सुधाकरपंत यांचं त्यांना सहकार्य राहिलेलं आहे. त्यामुळे ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळावर गेले होते. माझ्यामागे 600 अदृश्य मतं आहेत. पुढे काय होतंय? हे पाहू. आमच्यामागे महाविकास आघाडीतील कोण आहे, निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल, असंही मोहिते पाटलांनी सांगितलं.
ADVERTISEMENT











