Dhule Cash Seized : जिल्ह्यातील विकासकामांच्या पाहणीसाठी 22 आमदारांचं शिष्टमंडळ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं. या शिष्टमंडळातले 11 आमदार जिल्ह्यात पोहोचलेले होते. याच दौऱ्यादरम्यान धुळ्यात असलेल्या शासकीय विश्रामगृहात झालेली असते. ही रूम बूक केलेली असते, अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने. याच रूममध्ये मोठी रोकड या शिष्टमंडळाला देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गोळा करुन दिल्याची माहिती अनिल गोटेंना मिळते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असलेल्या अनिल गोटे यांनी मग पोलीस आणि संबंधीत यंत्रणांना फोन केले. पण यंत्रणांनी आधी काहीच प्रतिसाद दिला नाही. इथूनच पुढचं सगळं नाट्य सुरू झालं आणि कोट्यवधी रुपये सापडले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> शिंदेंच्या आमदाराच्या PA च्या रूममध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलं, सिनेस्टाईल राडा; धुळ्यात काल रात्री काय घडलं?
धुळ्याच्या गुलमोहर रेस्ट हाऊस रूम क्रमांक 102 मध्ये पोलिसांना 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून, माजी आमदार अनिल गोटे यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखं काल धुळ्यात या सगळ्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या.
धुळ्यातील घटनेचा संपूर्ण घटनाक्रम
- अनिल गोटे यांना त्यांच्या काही सुत्रांकडून आमदारांच्या शिष्टमंडळाला देण्यासाठी पैसे गोळा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनिल गोटे थेट समर्थकांसह गुलमोहर विश्राम गृहावर धडकले.
- अर्जुन खोतकर यांच्या खासरी स्वीय सहाय्यकाच्या नावावर ही रूम बूक केलेली होती. मात्र, हे प्रकरण घडलं तेव्हा हा स्वीय सहाय्यक रूमला टाळं ठोकून फरार झालेला होता अशी माहिती आहे.
- अनिल गोटे यांनी तिथंच खुर्ची टाकली आणि टाळं लावलेल्या रूमला पाहारा देत पोलीस आणि यंत्रणांना फोन केले.
- अनिल गोटे यांच्या फोनला कुणीच प्रतिसाद दिला नाही. जवळपास 2-3 तास काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं अनिल गोटे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी तिथंच ठिय्या मांडला.
- प्रकरण वाढण्याची शक्यता असतानाच यंत्रणांचे अधिकारी तिथे पोहोचले. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी रूम उघडली, तेव्हा तिथं खरंच पैशांचं मोठं घबाड सापडलं.
- पैशांचं घबाड पाहून अधिकारीही काही वेळ चक्रावले. त्यांनी चौकशी सुरू केली आणि कॅश मोजण्यासाठी थेट मशिन्स मागवले.
- रात्री 11 पासून सकाळी 4 वाजेपर्यंत ही सगळी मोजणी सुरू होती. ही मोजणी होईपर्यंत शिवसैनिक अनिल गोटेंसह तिथंच ठिय्या मांडून बसले होते.
- संपूर्ण मोजणी झाल्यानंतर या ठिकाणी तब्बल 1 कोटी 84 लाख रुपये असल्याचं यंत्रणांनी सांगितलं. मात्र, अनिल गोटे यांनी घटनास्थळी 5 कोटींपेक्षा जास्त रोकड असल्याचा दावा केला आहे. तब्बल 12 बॅग भरून रोकड घेऊन अधिकारी निघून गेले.
- आज सकाळपासून राज्यभर या प्रकरणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल गोटे यांचे आरोप खोटे आहेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही, खोटे आरोप करायची त्यांची जुनी सवय आहे असं खोतकर म्हटले आहे.
अनिल गोटेंनी काय आरोप केले?
हे ही वाचा >> वैष्णवी हगवणेचे 4 व्हॉईस मेसेज, मैत्रिणीला दु:खं सांगितलं, 'त्या' चॅटींगमधून समोर आली खळबळजनक माहिती
विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकावरच अनिल गोटेंनी आरोप केले. या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं. विकासकामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळातील सदस्यांना ही रक्कम पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. "ही रक्कम कोणी दिली आणि कोणासाठी होती, याचा तपास व्हायला हवा," अशी मागणी गोटे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
