‘…म्हणून शिंदे-फडणवीसांना सरकार स्थापन करावं लागलं’, राणेंनी सांगितलं कारण

मुंबई तक

29 Mar 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 11:45 PM)

Nitesh Rane: महाविकास आघाडीने आम्‍हाला प्रचंड त्रास दिला. भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. आम्‍हाला झालेला त्रास कमी करण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागलं. असं नितेश राणे म्हणाले.

eknath shinde devendra fadnavis had to come together and form the government nitesh rane

eknath shinde devendra fadnavis had to come together and form the government nitesh rane

follow google news

कणकवली: ‘कणकवली शहरात 5 एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता या वेळेत भव्य वीर सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवं वादळ निर्माण केलं जाणार आहे. वीर सावरकर यांच्यावर सातत्‍याने टीका करणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अडविण्याची हिंमत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहुल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत आहेत, ही त्‍यांची नौटंकी आहे.’ अशी थेट टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. याच वेळी बोलताना नितेश राणे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन सरकार का स्थापन केलं याबाबतही भाष्य केलं आहे. (eknath shinde devendra fadnavis had to come together and form the government nitesh rane said because)

हे वाचलं का?

कणकवली येथील प्रहार भवनमधील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ.नितेश राणे बोलत होते.

‘सगळा त्रास बाहेर काढण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी सरकार केलं स्थापन…’

‘ग्रामपंचायत निवडणुकांप्रमाणेच यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्‍ही लढविणार आहोत. महाविकास आघाडीने अडीच वर्षात आम्‍हाला प्रचंड त्रास दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. काहींवर केसेस दाखल केल्‍या. आम्‍हाला झालेला हा सगळा त्रास बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागले. ग्रामपंचायत निवडणूक आम्‍ही युतीच्या माध्यमातून लढवली. त्‍याच धर्तीवर जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका देखील आम्‍ही युतीच्या माध्यमातून लढविणार आहोत.’

अधिक वाचा- Savarkar row : सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो? समजून घ्या 5 मुद्द्यांमध्ये

‘युतीत कोणतेही वाद नाहीत उलट चांगल्‍या समन्वयाने काम सुरु आहे. राज्‍यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. यात शिवसेनेचे चाळीस आणि दहा अपक्ष आमदार यांचा मोठा वाटा आहे. हे आमदार आमच्यासोबत आले म्‍हणूनच युतीचे सरकार होऊ शकले आहे. त्‍यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ही यापुढे देखील कायम राहणार.’ असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

‘बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच वीर सावरकर यांच्याबद्दल आदर बाळगला. सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या मणीशंकर अय्यर यांना जोडे मारो आंदोलनही बाळासाहेब ठाकरे यांनी छेडले होते. मात्र त्‍यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी शांत राहणे पसंत केलं. ते मुख्यमंत्री असताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर वारंवार टीका केली. परंतु उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना अडविण्याची हिंमत दाखवली नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहुल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची नौटंकी आहे, ढोंगीपणा आहे, त्याला कोणीही माफ करणार नाही.’ असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

अधिक वाचा- सावरकर वाद: संजय राऊतांची थेट राहुल गांधी, सोनियांशी चर्चा; भाजपचं टेन्शन कायम!

कणकवलीमध्ये वीर सावरकर गौरव

‘राहुल गांधी, नाना पाटोले आणि काँग्रेसची मंडळी वीर सावरकर यांचा सातत्‍याने अपमान करत आहेत. त्‍यांना योग्‍य तो संदेश देण्यासाठी आम्‍ही 5 एप्रिल रोजी कणकवलीत भव्य अशी वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. कणकवलीतील वीर सावरकर गौरव यात्रा भव्यदिव्य असणार आहे. या यात्रेमध्ये सावरकर यांचा रथ असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्‍या भाषणांची चित्रफित दाखवली जाणार आहे. यात शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्‍याचबरोबर हिंदुत्‍ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेने सहभाग घ्यावा.’ असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.

    follow whatsapp