हैदराबाद गॅझेट गेमचेंजर ठरेल का?, मराठ्यांना OBC आरक्षणाचा लाभ मिळणं खरंच आहे सोप्पं?

Maratha Reservation and Kunbi Certificate: हैदराबाद गॅझेटमधील कुणबी नोंदींमुळे मराठा समाजातील काही व्यक्तींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, परंतु हा लाभ सरसकट सर्व मराठ्यांना मिळणार नाही. तो नेमका कोणाला आणि कशा पद्धतीने मिळेल हे सविस्तर जाणून घ्या.

Mumbai Tak

अतिक शेख

• 05:00 AM • 04 Sep 2025

follow google news

मुंबई: मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी हा मुख्य आधार ठरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठवाडा आणि इतर भागांतील मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार नसून, केवळ हैदराबाद गॅझेटमधील नोंदी आणि स्थानिक समितीच्या चौकशीद्वारे पात्र ठरलेल्यांनाच लाभ मिळेल. 

हे वाचलं का?

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

हैदराबाद गॅझेट हे निजामकालीन आणि ब्रिटिशकालीन दस्तऐवज आहे, ज्यामध्ये हैदराबाद संस्थानातील (आताच्या मराठवाड्यासह काही भाग) भौगोलिक, सामाजिक आणि लोकसंख्येबाबत माहिती नोंदवली आहे. 

  • - जिल्हा, तालुका, गावनिहाय लोकसंख्या: निजामकालीन 17 जिल्ह्यांतील गावनिहाय लोकसंख्येची नोंद.
  • - जाती-जमातींची माहिती: प्रत्येक गावातील जाती आणि जमातींची यादी, ज्यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख अनेकदा "कुणबी" असा आहे.
  • - शेतजमिनींचे रेकॉर्ड: बागायती आणि कोरडवाहू शेतजमिनींची माहिती.
  • - कुणबी नोंदी: 1850 च्या सुमारास ब्रिटिश अधिकारी रिचर्ड मिड यांनी केलेल्या जनगणनेत (१८८१ मध्ये प्रकाशित) मराठा आणि कुणबी समाजाला एकच मानले गेले आहे.

हे गॅझेट निजामकालीन जिल्ह्यांचे रेकॉर्ड स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित झाले असून, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये याचा विशेष उपयोग होत आहे.

हे ही वाचा>> Maratha Reservation GR: सरकारचा मोठा निर्णय.. पहिला GR आला समोर, वाचा नेमकं काय आहे त्यात! GR जसाच्या तसा

कोणाला मिळणार ओबीसी आरक्षण?

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही. केवळ खालील निकष पूर्ण करणाऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आणि त्याद्वारे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल:

  • पात्र कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठ्यांना
  • हैद्राबाद गॅझेटनुसार नोंदी असतील त्यांनाच
  • पुरावे नसल्यास प्रतिज्ञापत्रं सादर करावी लागणार
  • प्रमाणपत्रं मिळालेल्यांच्या नातेवाईकांनाही लाभ
  • स्थानिक समितीच्या प्रक्रियेतून जावं लागणार
  • चौकशीनंतर जातीला दाखला मिळण्याची सोय
  • हैद्राबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी हा मुख्य आधार

हे ही वाचा>> Maratha Reservation: मराठ्यांना जातीचा दाखला मिळाला म्हणजे खरंच आरक्षण मिळालं? समजून घ्या हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय!

कोणाला आरक्षण मिळणार नाही?

हैदराबाद गॅझेट किंवा इतर अधिकृत दस्तऐवजांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा असा उल्लेख नसलेले अपात्र ठरतील.

  • सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही
  • केवळ नोंदी असलेल्यांनाच प्रमाणपत्रं मिळणार
  • हैद्राबाद गॅझेटनुसार नोंदी नसतील तर आरक्षण नाही
  • चौकशीत अपात्र आढळलेल्यांना अर्जदारांना

स्थानिक समितीत कोण असणार?

कुणबी प्रमाणपत्रासाठी गावपातळीवरील चौकशी समितीत खालील अधिकारी असतील:

  1. ग्राम महसूल अधिकारी: गावातील महसूल रेकॉर्ड आणि दस्तऐवजांची पडताळणी करतील.
  2. ग्रामपंचायत अधिकारी: स्थानिक नोंदी आणि गावातील सामाजिक माहिती तपासतील.
  3. सहाय्यक कृषी अधिकारी: शेतजमिनीशी संबंधित रेकॉर्ड (बागायती/कोरडवाहू) पडताळतील.

ही समिती अर्जदाराच्या दस्तऐवजांची आणि गॅझेटमधील नोंदींची तपासणी करून पात्रतेचा निर्णय घेईल.

हैदराबाद गॅझेटचा महत्त्वाचा आधार

ऐतिहासिक संदर्भ: गॅझेटमधील नोंदींनुसार, मराठा आणि कुणबी समाजाला एकच मानले गेले आहे. 

हैद्राबाद गॅझेटमध्ये नेमकं काय आहे?

  • जिल्हा, तालुका, गावनिहाय लोकसंख्या
  • प्रत्येक गावातील जाती-जमातींची माहिती
  • बागायती, कोरडवाहू शेतजमीनींचे रेकॉर्ड्स
  • मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख
  • तालुकानिहाय कुणब्यांची लोकसंख्या

कुणबी दाखला मिळविण्याची नेमकी प्रक्रिया काय?

1. अर्ज सादर करणे: अर्जदाराने गावपातळीवरील समितीकडे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज, पुरावे आणि प्रत सादर करावे.
2. चौकशी: स्थानिक समिती गॅझेटमधील नोंदी, जमिनीचे रेकॉर्ड आणि नातलगांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करेल.
3. प्रमाणपत्र वितरण: पात्र ठरलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल.
4. अपील प्रक्रिया: अपात्र ठरलेल्यांना जिल्हा पातळीवर अपील करता येईल.

    follow whatsapp