अश्लील व्हिडीओ प्रकरण : भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्या मागे कुणाचा हात? माजी मुख्यमंत्र्यांनीच..

Manohar Dhakad Viral Video : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे नेते मनोहर लाल धाकड यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना जामीन मिळाला. पण...

Manoharlal Dhakad Viral Video Update

Manoharlal Dhakad Viral Video Update

मुंबई तक

• 03:52 PM • 02 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोहरलाल धाकड यांच्या अश्लील व्हिडीओमुळं खळबळ

point

धाकड यांना कोणत्या पक्षाच्या नेत्याचा सपोर्ट?

point

माजी मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे उडाली खळबळ

Manohar Dhakad Viral Video : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे नेते मनोहर लाल धाकड यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना जामीन मिळाला. परंतु, आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. मंदसौरमध्ये महाराणा प्रताप जयंतीला आयोजित कार्यक्रमात काँगेस नेते दिग्विजय सिंग आणि माजी आमदार यशपाल सिसोदिया यांनी उपस्थिती दर्शवली होती. याचदरम्यान दिग्विजय सिंग यांना मनोहरलाल धाकड प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी उत्तर न देता थेट सिसोदिया यांच्याकडे इशारा केला.

हे वाचलं का?

माजी मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे उडाली खळबळ

आता या प्रकरणी दिग्विजय सिंग यांच्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जेव्हा दिग्विजय सिंग यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सिसोदिया यांच्याकडे इशारा का केला? असा सवाल उपस्थित झाला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, मनोहर धाकड आणि यशपाल सिसोदिया एकाच संघटनात्मक विभागात काम करतात. पण दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो समोर आला नाहीय. सिसोदिया यांनी धाकड यांच्या पत्नीच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, अशी चर्चा आहे.

हे ही वाचा >>  Pune Crime : पुण्यातील 12 जणांना उडवणाऱ्या कार चालकाच्या मुसक्या आवळल्या, येरवडा कारागृहात केलं रवाना

यशपाल सिसोदिया काय म्हणाले?

या प्रकरणी यशपाल सिसोदिया यांचं म्हणणं आहे की, माझ्याकडे व्हिडीओच्या सत्यतेबाबत कोणतीही माहिती नाहीय. पक्ष याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेईल. दरम्यान, भाजपने याआधीच स्पष्य केलं आहे की, पक्षाचा मनोहर धाकडशी कोणताही थेट संबंध नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाचं नुकसान झाल्याचंही भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांनाही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, मनोहरलाल धाकड भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत. त्यांची पत्नी जिल्हा पंचायत सदस्य आहे. पण पक्षाशी त्यांचा थेट संबंध नाही. या व्हायरल व्हिडीओनंतर सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धाकड यांना महासभा युवा संघाने तातडीनं पदावरून हटवलं आहे. ते यामध्ये राष्ट्रीय पदावर कार्यरत होते. राष्ट्रीय अध्यक्ष अर्जून धाकड यांनी म्हटलं की, संघटनेची प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हे ही वाचा >> कोण होते ते VIP गेस्ट? ज्यांना 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाने केलेली हत्या!

    follow whatsapp