Pune Crime : पुण्यातील 12 जणांना उडवणाऱ्या कार चालकाच्या मुसक्या आवळल्या, येरवडा कारागृहात केलं रवाना

मुंबई तक

Pune Crime Drunk And Drive : पुण्यातील 12 जणांना उडवणाऱ्या कार चालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात अनेक मोठे ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहेत. कार चालकाने केलेल्या अपघातमुळे आरोपी येरवडा कारागृहात कैद करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

pune drunk and drive Sadashiv Peth Case
pune drunk and drive Sadashiv Peth Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरात हिट अँड रनचे असंख्य प्रकरण घडताना दिसतात

point

पुण्यातील भावे हायस्कूलनजीक घडलेल्या अपघाताच्या घटनेत मोठा ट्विस्ट

point

आरोपी येरवडा कारागृहात

Pune Crime Drunk And Drive : पुणे शहरात हिट अँड रन तसेच ड्रंक अँड ड्राईव्हसारखे प्रकार घडताना दिसत आहेत. पुणे पोर्शे घटनेला एक वर्षे पूर्ण होताच आता ट्रंक अँड ड्राईव्हने पुणे हादरून गेलं आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथील भावे हायस्कूलजवळ असणाऱ्या चहाच्या हॉटेलसमोर मोठा अपघात झाला. या अपघातात 12-13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील पाच जण हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे तरुण होते. ज्याने हा अपघात केला त्याला येरवडा पोलीस कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा :  मोठा गेम झाला यार... लॉटरीचे 30 कोटी घेऊन गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत!

जयराम शिवाजी मुळे वय वर्षे 27 असे त्याचे नाव आहे. हा पुण्यातील बिबवेवाडी येथील रहिवासी आहे. दरम्यान, कार ड्रायव्हिंग करणाऱ्यासोबत एक साथीदार होता त्याचे नाव राहुल गोसावी असे असून त्याचे वय वर्षे हे 27 आहे. पोलिसांनी जबाब नोंदवत संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. 

नेमकं काय घडलं? 

सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या एका गल्लीत चहाचे दुकान आहे. त्याच चहाच्या दुकानासमोर हे ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार घडला आहे. यावेळी दुकानासमोर थांबलेल्या बारा जणांना शनिवारी सायंकाळच्या सुमारास कार ड्रायव्हरने भरधाव वेगाने गाडी चालवत निष्पापांना चिरडले. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारचाकी चालवता येत नसूनही त्याने कार चालवत अपघात केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला आणि न्यायालयाने आरोपी मुळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

हेही वाचा : आईचे परपुरूषासोबत लिव्ह-इन संबंध, मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले!

या घटनेनं पुणे शहर पुरतं हादरून गेलं आहे. याआधीही पुण्यात अशा अनेक घटना घडल्या होत्या. तर काही महिन्यांपूर्वी एका व्यवसायिकाच्या मुलाने पुण्यातील एका सिग्नलवर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केली होती. तर त्याआधी म्हणजेच एका वर्षापूर्वी पुण्यातील पोर्शे प्रकरणातील बड्या बापाच्या बेट्याने दोन अभियांत्रिकांना ड्रंक आणि ड्राईव्ह करत हिट अँड रन केलं होतं. त्यानंतर पुण्यात अपघाताच्या सर्हास घटना घडत आहेत. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp