कोण होते ते VIP गेस्ट? ज्यांना 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाने केलेली हत्या!
अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र तरीही यामधील काही प्रश्न ही अनुत्तरितच असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अंकिता भंडारी केसमधील नवीन खुलासे

स्पेशल सर्व्हिस मिळणारे 'ते' VIP पाहुणे नेमके कोण?

रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाकडून हत्या
Ankita Bhandari Case: उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या अंकिता भंडारीची वयाच्या 19 व्या वर्षीच हत्या करण्यात आली होती. अंकिता पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा परिसरातील एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये म्हणून काम करत होती. अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी पोलिसांनी रिसॉर्टचे मालक पोलिसांनी रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर आणि असिस्टंट मॅनेजर अंकित गुप्ता यांना अटक केली होती.
31 मे रोजी कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने या तिघांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळाली असली तर यामधील काही प्रश्न ही अनुत्तरितच असल्याचं समोर आलं आहे.
व्हॉट्सअॅप चॅटवरून खुलासे
अंकिताचा मित्र पुष्प दीप याच्या व्हॉट्सअॅपमधून बरेच खुलासे झाल्याचे समोर आलं आहे. रिसॉर्टचा मालक आणि हत्येतील आरोपी पुलकित आर्य याची रिसेप्शनिस्ट अंकितावर आधीच वाईट नजर असल्याचं चॅटमध्ये उघड झालं. त्याने अंकिताला त्याच्या शेजारील रूममध्ये शिफ्ट केलं होतं.
उत्तराखंडातील राज्यमंत्री असलेले विनोद आर्य यांचा धाकटा मुलगा पुलकित हरिद्वारमध्ये राहत होता आणि तो रिसॉर्टमध्ये राहायचा. त्याने अंकिताला रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामावर ठेवले होते. अंकिताला सोडून तिथे कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. इतकेच नव्हे तर रिसॉर्टमध्ये गेस्टसुद्धा खूपच कमी येत होते. रिसॉर्टमधील खोल्या रिकाम्याच होत्या. रिसॉर्ट कधीकधी फक्त पार्ट्यांसाठी बुक केले जात असे. अंकिताने तिथे महिला कर्मचारी का नाहीत? असं विचारलं देखील होतं. त्यावर चोरी झाल्यामुळे एका मुलीला काढून टाकण्यात आल्याचं तिला सांगण्यात आलं.