Lok Sabha Election 2024 : मविआच्या बैठकीनंतर राऊतांनी दिली सर्वात मोठी बातमी

ऋत्विक भालेकर

• 09:04 PM • 27 Feb 2024

maha vikas aghadi, Sanjay Raut, Nana Patole, Jayant Patil, Lok Sabha Election 2024, prakash ambedkar

या बैठकीत कोणत्याही जागेवरून आमच्यात मतभेद नाही आहे. 48 जागांवर एकमत झाले आहे.उद्या एक अंतिम बैठक होणार आहे, त्यानंतर पक्षाचे प्रमुख जागावाटपाची घोषणा करतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

maha vikas aghadi seat sharing meeting sanjay raut share update media nana patole jayant patil prakash ambedkar vanchit bahujan aghadi lok sabha election 2024

follow google news

Maha vikas Aaghadi Meeting, Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे. आज सुद्धा महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोणत्याही जागेवरून आमच्यात मतभेद नाही आहे. 48 जागांवर एकमत झाले आहे.उद्या एक अंतिम बैठक होणार आहे, त्यानंतर पक्षाचे प्रमुख जागावाटपाची घोषणा करतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी म्हटले आहे.  (maha vikas aghadi seat sharing meeting sanjay raut share update media nana patole jayant patil lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर या नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. 

या बैठकीवर संजय राऊत म्हणाले की, आमच्या जागावाटपाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आमचं 48 जागांवर एकमत झालं आहे. आमच्यात कोणत्याही जागेवरून मतभेद नाही आहेत. तसेच प्रत्येक जागा जिंकण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : विधानसभेत SIT ची घोषणा होताच जरांगेंची तात्काळ दिलगिरी?

राऊत पुढे म्हणाले, वंचितचे प्रतिनीधीही आजच्या बैठकीत सहभागी झाले होते. आम्ही त्यांना प्रस्ताव दिला आहे आणि ते उद्या परत बैठकीला येतील. मला खात्री आहे की उद्या आमची शेवटची भेट असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. 

दरम्यान संजय राऊत यांनी उद्या महाविकास आघाडीची जागावाटपा संदर्भात अंतिम बैठक होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उद्याच जागावाटपाची घोषणा होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. यावर राऊत म्हणाले की, उद्या जागावाटपाची कोणतीही घोषणा होणार नाही आहे.  पण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकत्रितपणे जागावाटपाची घोषणा करणार आहेत, असे राऊतांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा : Manoj Jarange : 'मला जर अटक झाली ना...'

दरम्यान आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला प्रस्ताव दिला आहे.  ते आपापसात चर्चा करून उद्या परत येतील. आम्हाला खात्री आहे की उद्या किंवा परवा आम्ही आमचा जागावाटपाची घोषणा करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. 

वंचितला किती जागा मिळणार?

दरम्यान आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून (VBA)धैर्यवर्धन फुंडकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी फुंडकर यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला देण्याची मागणी केली. त्यानंतर वंचित त्यांच्या जागांचा प्रस्ताव देईल, असे फुडकर यांनी सांगितले आहे. 

    follow whatsapp